AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yasin malik : यासिन मलिकला थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाणार, काश्मीरमध्ये समर्थकांची दगडफेक, पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर

मलिकने आझादी च्या नावाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने जगभरात नेटवर्क तयार केले होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी एनआयएने स्वत:हून दखल घेत 30 मे 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता.

Yasin malik : यासिन मलिकला थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाणार, काश्मीरमध्ये समर्थकांची दगडफेक, पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर
यासिन मलिकImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2022 | 6:58 PM
Share

नवी दिल्ली : फुटीरतावादी नेता यासिन मलिकवर (Yasim malik) कोर्टात सध्या जोरदार युक्तिवाद सुरू आहे. एनआयएने पटियाला कोर्टाकडे (Pariyala Court) यासिनला फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती केली आहे. मात्र यावरून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पुन्हा तणावाचे वातावरण तयार झाले आहे. यासिनच्या समर्थकांकडून पुन्हा जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. तसेच यासिन मलिकच्या श्रीनगरमधील घराबाहेर काही तरुण जमले आहेत. ते यासिनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत.  त्यामुळे श्रीनगरमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून या परिसरावर आणि यासिनच्या घरावर नजर ठेवली आहे. याआधी गुरुवारी कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले होते. यासीन मलिकने सुनावणीदरम्यान काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. यासीन मलिकच्या वकिलाने केलेल्या युक्तीवावेळी त्याच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. मलिक यांच्याकडे 11 कनाल म्हणजे सुमारे 5564 चौरस मीटर जमीन आहे, ती त्यांनी वडिलोपार्जित म्हणून सांगितली आहे. याआधी यासिन मलिकला दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर करण्यात आले होते. या शिक्षेवर न्यायालयात युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

एनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात

पटियाला कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पटियाला कोर्टाबाहेर CAPF, स्पेशल सेलचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मलिकने ‘आझादी’च्या नावाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने जगभरात नेटवर्क तयार केले होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी एनआयएने स्वत:हून दखल घेत 30 मे 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी 18 जानेवारी 2018 रोजी डझनहून अधिक जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

कोणत्या कलमांतर्गंत यासीन दोषी?

कलम 16 (दहशतवादी कारवाया), 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य असणे) या कलमांसाठी तो दोषी असल्याचे यासीन मलिकने न्यायालयाला सांगितले होते. UAPA आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) अशा विविध गुन्ह्यात यासिनला दोषी ठरवण्यात आले आहे.

आधीही अनेकजण अटकेत

यापूर्वी फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, फरार अहमद शाह यांना अटक केली होती. शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर आरोप निश्चित करण्यात आले. लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ज्यांना या प्रकरणात फरार गुन्हेगार असे जाहीर करण्यात आले होते.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.