AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समलैंगिक अ‍ॅप, फ्लॅट 1, तरुण 7… खोलीत नेमकं काय घडलं? एकाचा मृत्यू, पोलिसांनी…

समलैंगिक अॅपच्या माध्यमातून तरुणाची सहा तरुणांशी ओळख झाली. त्यांनी एका फ्लॅटमध्ये भेटण्याचे ठरवले. पण नंतर जे घडलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकरली. नेमकं काय घडलं? वाचा...

समलैंगिक अ‍ॅप, फ्लॅट 1, तरुण 7... खोलीत नेमकं काय घडलं? एकाचा मृत्यू, पोलिसांनी...
Gay coupleImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 27, 2025 | 5:49 PM
Share

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरुणाचा सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आता आठव्या मजल्यावरील त्या खोलीत नेमकं काय घडलं? याची चौकशी पोलिसांनी केली. तेव्हा जे सत्य समोर आले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.

नेमकं काय घडलं?

दिल्लीला लागून असलेल्या नोएडाच्या सेक्टर-113 पोलीस ठाणे क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्टर-74 येथील नार्थ आय सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडून एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हा तरुण आपल्या ६ मित्रांना भेटण्यासाठी इथे आला होता. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीद्वारे समजलं की, हे सर्व एका समलैंगिक अ‍ॅपद्वारे भेटले होते आणि त्यांनी भेटीची योजना आखली होती.

वाचा: मला Kiss केलं, मग शर्टमध्ये हात घातला…; अभिनेत्रीसोबत चालत्या गाडीत घृणास्पद कृत्य

आठव्या मजल्यावरुन तरुण पडला

समोर आलेल्या माहितीनुसार, अलीगढच्या हरदुआगंज येथील रहिवासी शुभम कुमार याची सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन समलैंगिक अ‍ॅपद्वारे ६ तरुणांच्या गटाशी मैत्री झाली होती. सर्वांनी शनिवारी सेक्टर-74 येथील नार्थ आय सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भेटण्याची योजना आखली होती. हा फ्लॅट शॉर्ट स्टेसाठी भाड्याने घेण्यात आला होता. सर्वजण शनिवारी फ्लॅटवर पोहोचले होते. रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुभम कुमार आठव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्यासह इतर अवयवांना दुखापत झाली.

शुभम कुमारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे शुभमचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि शुभमचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना प्राथमिक तपासात समजलं की, काही तरुण रात्रीच निघून गेले होते. सातहीजण पूर्णपणे नशेत असल्याचं समजतं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन तरुणांना ताब्यात घेतलं. पोलिस अधिकारी कृष्ण गोपाल शर्मा यांनी सांगितलं की, ताब्यात घेतलेल्या दोन्ही तरुणांची चौकशी सुरू आहे. मृतकाच्या नातेवाईकांकडून तक्रार मिळाल्यानंतर तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. ही घटना ऐकून प्रत्येकजण हादरला आहे.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.