Zojila Tunnel Project : ‘एमईआयएल’चे जोजिला बोगदा प्रकल्पात मोठे यश!, 5 किलोमीटर लांब टनेलचं काम पूर्ण

Zojila Tunnel Project : 'एमईआयएल'चे जोजिला बोगदा प्रकल्पात मोठे यश!, 5 किलोमीटर लांब टनेलचं काम पूर्ण
जोजिला बोगदा प्रकल्प

जोजिला बोगदा - नीलग्रार 1, 2 आणि जोजिला मुख्य बोगद्याला समुद्रसपाटीपासून 3 हजार 528 मीटर उंचीवर बर्फवृष्टी आणि अन्य प्रतिकूल वातावरणातही वेगाने पार केला जाऊ शकणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा द्विदिश बोगदा, जोजिला बोगदा युद्धजन्य स्थिती आणि अन्य धोरणात्मक कारणांसाठी भारतातील एक आव्हानात्मक विकास प्रकल्प आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 16, 2022 | 11:31 PM

नवी दिल्ली : मेघा इंजीनिअरिंग अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL)ने 14 महिन्याच्या रेकॉर्डब्रेक वेळेत 18 किलोमीटर लांब ऑल वेदर जोजिला बोगद्याचं 5 किलोमीटर लांबीचं काम पूर्ण करत मैलाचा दगड निर्माण केला आहे. एमईआयएलद्वारे कार्यान्वित झालेला राष्ट्रीय महामार्ग (National Highway) आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) चा हा प्रकल्प श्रीनगर आणि लडाख जोडणारा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

जोजिला बोगदा – नीलग्रार 1, 2 आणि जोजिला मुख्य बोगद्याला समुद्रसपाटीपासून 3 हजार 528 मीटर उंचीवर बर्फवृष्टी आणि अन्य प्रतिकूल वातावरणातही वेगाने पार केला जाऊ शकणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा जोजिला बोगदा युद्धजन्य स्थिती आणि अन्य धोरणात्मक कारणांसाठी भारतातील एक आव्हानात्मक विकास प्रकल्प आहे.

जोजिला बोगद्याचे प्रकल्प प्रमुख हरपाल सिंह यांनी सांगितलं की, ‘आमच्या एमईआयएल टीमने कठीण परिस्थितीतही समर्पण आणि मोठ्या मेहनतीने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे’. सध्यस्थितीत जम्मू आणि काश्मिरच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील तापमान तब्ब्ल उणे 30 डिग्री सेल्सियसपर्यंत गेलं आहे.

गडकरींकडून MEIL च्या प्रयत्नांचे कौतुक

या प्रकल्पात एकूण 3 बोगदे, 4 पूल, बर्फापासून संरक्षण देणारी यंत्रणा, छोते पूल, कॅच डॅम, डिफ्लेक्टर डॅम कट अॅन्ड कव्हर टनेल आणि असे अनेक इंजिनिअरिंग कारनामे पाहायला मिळतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दौऱ्यात या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वास नेण्याच्या एमईआयएलच्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. जोजिला बोगदा प्रकल्प जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सामाजिक, आर्थिक स्थिती, परिवहन आणि पर्यटनात मोठी सुधारणा करणारा ठरेल, असंही गडकरी म्हणाले होते.

काय आहे जोजिला बोगदा प्रकल्प?

एमईआयएलया (MEIL) या भारतातील आघाडीच्या कंपनीकडे 1 ऑक्टोबर, 2022 रोजी काश्मीर खोरे आणि लडाखला जोडणारा ऑल-वेदर कनेक्टिव्हिटी प्रकल्प (ZOJILA PROJECT) देण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण लांबी 32 किलोमीटर आहे आणि या दोन भागात विभागला गेला आहे.

या प्रकल्पाच्या 18 किलोमीटर भागात सोनमर्ग आणि तलतालला जोडतो. यात मुख्य पूल आणि दोन बोगदे आहेत. टनेल टी 1 मध्ये दोन ट्यूब लावण्याची योजना आहे. एमईआयएलने मे 2021 मध्ये एक्सेस रोडच्या निर्माणानंतर या प्रकल्पाचं काम सुरु करण्यात आलं. हिमालयातून बोगदा निर्मितीचं काम खूप कठीण आहे. मात्र, एमईआयएलने एका विशिष्ट वेळेत सुरक्षा, गुणवत्ता आणि वेग या सर्वोच्च मानांकनाने दोन्ही बोगदे तयार केले आहेत.

13.3 किलोमीटर लांब जोजिला मेन बोगद्याचं कामही वेगाने सुरु आहे. एमईआयएलने लडाखपासून 600 मीटर पुढे आणि काश्मिरज्या दिशेनं 300 मीटरची प्रगती केली आहे. हा प्रकल्प सप्टेंबर 2026 मध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण काम योग्य मार्गावर आणि वेळेत सुरु आहे.

एमईआयएल (MEIL)

मेघा इंजिनिअरिंग अॅन्ड इंफ्रास्टक्चर लिमिटेड (MEIL) एक विविध क्षेत्रात काम करणारी जागतिक दर्जाची कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय हैदराबादेत आहे. कंपनीची स्थापना 1989 मध्ये झाली होती. या कंपनीने मागील तीन दशकांत 60 देशात आपली ओळख निर्माण केली आहे. ही कंपनी सिंचन, तेल आणि गॅस, परिवहन, वीज, इलेक्ट्रिक वाहन, संरक्षण आणि विनिर्माण अशा अनेक क्षेत्रात काम करते. या कंपनीने तेलंगणातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या कालेश्वरमचे काम पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. या कंपनीने आपले कौशल्य आणि क्षमतेच्या जोरावर अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत.

इतर बातम्या :

Photo : उदयनराजेंना ‘पुष्पा’ची भुरळ, साताऱ्यात सेल्फी पॉईंटवर थेट लुंगीमध्ये! तर संभाजीराजेंची जंगल सफारी

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा मृत्यू, साखळी स्फोटात सलीम गाझीची काय भूमिका?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें