Marathi News » Photo gallery » MP Udayan Raje Bhosle wearing Lungi at Selfie Point in Satara, while MP Sambhaji Raje's Jungle Safari
Photo : उदयनराजेंना ‘पुष्पा’ची भुरळ, साताऱ्यात सेल्फी पॉईंटवर थेट लुंगीमध्ये! तर संभाजीराजेंची जंगल सफारी
खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळे उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. आताच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चित्रपटाची भुरळ उदयनराजेंना पडल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज जंगल सफारीचा आनंद घेतला. किनवट तालुक्यातील घनदाट आणि दुर्गम जंगलात पहाटेच्या सुमारास जाऊन त्यांनी पाहणी केली.
खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळे उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. आताच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चित्रपटाची भुरळ उदयनराजेंना पडल्याचं पाहायला मिळत आहे.
1 / 5
दनयराजे आज थेट लुंगी परिधान करुन साताऱ्यातील सेल्फी पॉईंटवर पोहोचले. तिथे त्यांनी फोटो काढण्याचा आनंद लुटला. यावेळी आज लुंगी घालण्याचं विशेष कारण काय असं विचारलं असता, मोकळं वाटतंय, छान वाटतंय म्हणून लुंगी घातल्याचं उदयनराजे म्हणाले.
2 / 5
उदयनराजे यांनी कॉलर उडवली.
3 / 5
तर दुसरे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज जंगल सफारीचा आनंद घेतला.
4 / 5
किनवट तालुक्यातील घनदाट आणि दुर्गम जंगलात पहाटेच्या सुमारास जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.