काबूलमधून 16000 हजार ब्रिटीश-भारतीय सैनिकांनी माघार घेतली, पण निर्धारीत ठिकाणी फक्त एकच जिवंत पोहोचला, इतरांचं काय झालं? वाचा सविस्तर

एवढं सगळं होऊनही अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याचे ब्रिटीशांनी प्रयत्न सोडले नाहीत. दुसरं अँग्लो-अफगाण युद्ध 1878 ते 80 मध्ये लढलं गेलं आणि त्यातूनच मार्ग काढला गेला. त्या युद्धामुळेच रशियन साम्राज्याला अफगाणिस्तानमध्ये पाय ठेवता आला नाही. परिणामी भारतही रशियन साम्राज्यासाठी दूरच राहीला.

काबूलमधून 16000 हजार ब्रिटीश-भारतीय सैनिकांनी माघार घेतली, पण निर्धारीत ठिकाणी फक्त एकच जिवंत पोहोचला, इतरांचं काय झालं? वाचा सविस्तर
Remnants _of_Army
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 1:09 AM

युद्धाच्या कथा रम्य असतात पण युद्ध कधीच रम्य नसतं. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, पानिपत अशा किती तरी जागतिक आणि क्षेत्रीय लढायांबद्दल आपण वाचलंय, ऐकलंय. पण आज अशा एका लढाईची गोष्ट बघुया, ज्यानं ब्रिटीश साम्राज्याला आतून हादरुन सोडलं. अर्थातच ही लढाईसुद्धा अफगाणिस्तानमध्येच लढली गेली आणि तिच्या केंद्रस्थानी होता हिंदुस्थान. लढाई ब्रिटीश आणि अफगाणांमध्ये लढली गेली. ब्रिटीशांच्या सैन्यात अर्थातच सर्वाधिक संख्या ही भारतीयांचीच होती. इतिहासात ही लढाई किंवा संपूर्ण काळ ‘द ग्रेट गेम’ म्हणून ओळखला जातो. कारण यात ब्रिटीश आणि रशियन अशा दोन साम्राज्यांचे हितसंबंध अडकलेले होते. लढाई झाली ती अफगाणिस्तानमध्ये लढली. लढली गेली भारतीयांच्या बळावर. अर्थातच बळीही तेच ठरले. ह्या लढाईत ब्रिटीश सैनिकांचे अतोनात हाल झाले. एवढे की, काबूलमधून ज्यावेळेस सैनिकांनी माघार घेतली त्यावेळेस त्यांची संख्या 16 हजार एवढी होती आणि जलालाबादमध्ये मात्र फक्त एक सैनिक जीवंत पोहोचला. दरम्यान जे घडलं ते इतिहासातलं सर्वात मोठ्या हत्याकांडापैकी एक आहे. साल होतं-1842.

‘द ग्रेट गेम’ची पार्श्वभूमी (The great Game) 19 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ब्रिटीशांची सत्ता होती. ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार चालत होता. त्यावेळेस उत्तरेत रशियन साम्राज्य होतं. रशियन कधीही अफगाणिस्तान ओलांडून भारतात येतील आणि आक्रमण करतील अशी भीती त्यावेळेस ब्रिटीश साम्राज्याला वाटत होती. उत्तरेतून येणाऱ्या टोळ्या अफगाणिस्तानातूनच भारतात यायच्या आणि लूट करायच्या. तसा इतिहास होताच. त्यामुळे ब्रिटीशांना रशियन साम्राज्याची भीती वाटणं साहजिक होतं. त्यांचा बंदोबस्त करायचा तर अफगाणिस्तानच हातात घ्यायला हवा असं त्यावेळेस ब्रिटीशांना वाटत होतं. त्यावेळेस दोस्त मोहम्मद हा अफगाणिस्तानचा शासनकर्ता होता. त्यानं सगळ्या टोळ्यांना एकत्र करुन सत्ता मिळवलेली होती. ते साल होतं 1818. म्हणजे आपल्याकडे शेवटच्या पेशव्याचा पराभव होऊन मराठा साम्राज्य संपलं तेच वर्ष. रशियन साम्राज्याला रोखण्यासाठी ब्रिटीशांनी दोस्त मोहम्मदसोबत चांगले संबंध ठेवलेले होते. पण ते फार काळ टिकले नाहीत. 1837 साली दोस्त मोहम्मद हा रशियन साम्राज्यासोबत हातमिळवणी करतोय असं ब्रिटीशांना प्रकर्षानं वाटायला लागलं.

दोस्त मोहम्मदला हटवलं, शाह शुजा नवा राजा शेवटी दोस्त मोहम्मदचा बंदोबस्त करण्यासाठी 20 हजार ब्रिटीश सैनिकांनी, जे बहुतांश भारतीय होते, काबूलकडे कूच केली. 1838 सालच्या शेवटी ह्या सैन्यानं प्रवास सुरु केला आणि अतिशय खडतर प्रवास करत ते 1839 ला काबूलमध्ये पोहोचले. अफगाणिस्तानमध्ये त्यांना फार विरोध झाला नाही. ब्रिटीशांनी अफगाण शासक दोस्त मोहम्मदला हटवलं आणि दशकभर अज्ञातवासात असलेल्या शाह शुजाला गादीवर बसवलं. अफगाण लोकांना ही गोष्ट फार रुचली नाही. हळूहळू त्यांच्यात रोष वाढत गेला आणि शेवटी त्यानं वादळाचं रुप धारण केलं. ह्या वादळात ब्रिटीश साम्राज्याची प्रचंड वाताहत झाली.

आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांचे मुंडके टांगले शाह शुजाला गादीवर बसवल्यानंतर संपूर्ण ब्रिटीश सैन्यानं माघार घ्यायची असं ठरलेलं होतं. ह्या मोहिमेची जबाबदारी दोन ब्रिटीश अधिकाऱ्यांवर होती. एक होता सर विल्यम मॅग्टेन (Sir William McNaghten) आणि दुसरा होता सर अलेक्झांडर बर्न्स (Sir Alexander Burnes). शाह शुजाला गादीवर बसवलं तरीसुद्धा त्याची सत्ता अजूनही डळमळीतच होती. त्यामुळे मॅग्टेन आणि बर्न्स यांनी ब्रिटीश सैन्याच्या दोन ब्रिगेड काबूलमध्येच ठेवायचा निर्णय घेतला. असं अतिक्रमण करुन सत्ता हस्तगत करणारे सहसा काबूलच्या मजबूत तटबंदी असलेल्या किल्ल्यात रहायचे. पण ब्रिटीश कसे पॉवरफूल आहेत हे दाखवण्यासाठी बर्न्स काबूल शहरात रहायला लागला. ब्रिटीशांनी स्वत:चा बेस बनवला. कँटोनमेंट एरिया तयार केला. जे ब्रिटीशांचे हितचिंतक होते त्यांनी बर्न्सना अफगाण लोक बंड करण्याच्या तयारीत आहेत, ते कसे धोकादायक होतायत हेही सांगितलं पण बर्न्सला अती आत्मविश्वास होता. पण शेवटी व्हायचं तेच झालं. 1841 च्या नोव्हेबर महिन्यात काबूलमध्ये बंड उफाळलं. अफगाण जनता आक्रमक झाली. अलेक्झांडर बर्न्स ज्या घरात रहायचा, त्याला गर्दीनं वेढा टाकला. बर्न्सनं पैसे वगैरेची टोळक्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. फक्त बर्न्सचीच नाही तर त्याच्या भावाचीही क्रूरपणे हत्या करण्यात आली. बर्न्सचं मुंडकं चौकात लटकवलं गेलं.

ब्रिटीशांचा तह नोव्हेबर महिन्याच्या शेवटी, ब्रिटीश आणि अफगाण यांच्यात तह झाला. ब्रिटीशांनी काबूलमधून माघार घेण्याचं मान्य केलं. पण दोस्त मोहम्मदचा मुलगा मुहम्मद अकबर खान हा काबूलमध्ये अवतरला आणि त्यानं कडवड धोरण स्वीकारलं. सर विल्यम मॅग्टन(Sir William McNaghten) जे ब्रिटीशांचे दुसरे टॉपचे अधिकारी होते आणि तहाची बोलणी करत होते, त्यांचीही 23 डिसेंबर 1841 रोजी हत्या केली आणि ती खुद्द मुहम्मद अकबर खानने केली. ब्रिटीशांमध्ये दहशत पसरली.

कत्तल शेवटी 6 जानेवारी 1842 रोजी ब्रिटीश सैन्यानं काबूलमधून माघार घ्यायला सुरुवात केली. त्यात 4 हजार 500 सैनिक होते आणि 12 हजार नागरीक. महिला आणि मुलही होती. त्यांचं पोहोचण्याचं ठिकाण होतं जलालाबाद. तिथे ब्रिटीशांची छावणी होती. काबूल ते जलालाबाद हे 90 मैलाचं अंतर होतं. वातावरण खराब होतं. म्हणजे बर्फ पडत होता. तापमान उणे होत होतं. थंडी तोंड काढू देत नव्हती. तरीही ब्रिटीशांसमोर काबूल सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. नाही सोडलं तर एकही जण वाचण्याची शक्यता नव्हती. तशाच परिस्थितीत ब्रिटीश सैन्यानं काबूल सोडलं. व्हायचं तेच झालं. पहिल्या एक दोन दिवसातच कडाक्याच्या थंडीत अनेक जण गारठून मेले. ब्रिटीशांचा हा 16 हजार सैनिकांचा कबिला जेव्हा खूर्द काबूलच्या पर्वतमय भागातून जात होता, त्यावर अफगाण टोळ्यांनी हल्ले चढवले. त्यानं अफरातफर माजली. आधीच उणे तापमान आणि त्यात अफगाण टोळ्यांचे हल्ले. ब्रिटीश सैनिक सैरभैर होऊन पळत सुटले. काही जण भूकेनं मेले. जलालाबादला 16 हजार ब्रिटीश सैन्य पोहोचणं अपेक्षीत होतं. पण अफगाण टोळ्यांनी असं काही शिरकाण केलं की फक्त एक ब्रिटीश सैनिक कसाबसा मरणासन्न अवस्थेत पण जीवंत जलालाबादला पोहोचला. तो ज्या घोड्यावर पोहोचला होता, त्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्या सैनिकाचं नाव होतं डॉ. विल्यम ब्रायडन. तो आर्मी सर्जन होता. इतिहासात कदाचित हे एकमेव उदाहरण असेल की माघार घेणाऱ्या सैनिकांची अशी कत्तल केली गेली.

रेमनंटस ऑफ अॅन आर्मी (Remnants of an army ) डॉ. विल्यम ब्रायडन हे स्वत:च्या गांजलेल्या घोड्यावरुन मरणासन्न अवस्थेत एकटेच जलालाबादला पोहोचले. इतर कुणी अजून जीवंत आहे का याचा शोध ब्रिटीशांनी घेतला पण कुणीच सापडलं नाही. 15 हजार 999 जणांनी जीव गमावला. काहींची अफगाण टोळ्यांनी कत्तल केली, काही भूकेने मेले. काही ब्रिटीश अधिकाऱ्यांना बंदूकीच्या दस्त्यानं ठेचून मारल्याचही सांगितलं जातं. एक जगप्रसिद्ध पेंटींग आहे-रेमनंटस ऑफ अॅन आर्मी नावाची. ब्रिटीश पेंटर एलिझाबेथ थॉमसन यांनी ती 1870 मध्ये ती साकारलीय. डॉ. विल्यम ब्रायडन कशा अवस्थेत जलालाबादला पोहोचला याची दाहकता त्या चित्रातून येते. असं सांगितलं जातं की-ब्रिटीश सैन्याची कशी कत्तल केली गेली हे सांगण्यासाठीच अफगाण टोळ्यांनी डॉ. विल्यम ब्रायडन यांना जीवंत सोडलं.

एवढं सगळं होऊनही अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याचे ब्रिटीशांनी प्रयत्न सोडले नाहीत. दुसरं अँग्लो-अफगाण युद्ध 1878 ते 80 मध्ये लढलं गेलं आणि त्यातूनच मार्ग काढला गेला. त्या युद्धामुळेच रशियन साम्राज्याला अफगाणिस्तानमध्ये पाय ठेवता आला नाही. परिणामी भारतही रशियन साम्राज्यासाठी दूरच राहीला.

ITR Filing Date Extended : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

लॅपटॉपच्या बाजूला AK-47, तालिबान सरकारनं निवडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं शिक्षण नेमकं किती?

शेती, फळपिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान द्या; राजेश टोपेंचे निर्देश

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.