लॅपटॉपच्या बाजूला AK-47, तालिबान सरकारनं निवडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं शिक्षण नेमकं किती?

हाजी मोहम्मद इदरिस याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्यासमोर एका बाजूला लॅपटॉप आहे तर दुसरीकडे AK-47 रायफल ठेवण्यात आली आहे.

लॅपटॉपच्या बाजूला AK-47, तालिबान सरकारनं निवडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं शिक्षण नेमकं किती?
Mohammed Idrees
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 5:27 PM

काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आलीय. एकाहून एक खतरनाक दहशतवादी आता तालिबानाच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी बसले आहेत. मुल्ला हसन अखूंदची अफगाणिस्तानचे पंतप्रधानपदी निवड झालीय. मुल्ला बरादर हे उपपंतप्रधान असतील. तालिबानच्या या मंत्रिमंडळात हक्कानींना वजनदार मंत्रिपद भेटलेलं आहे. सिराजुद्दीनं हक्कानी हे गृहमंत्री असतील. आता तालिबानाच्या काळ्या पैशांना अधिकृत करणाऱ्या हाजी मोहम्मद इदरिस याच्याकडे अफगाणिस्तानातील रिझर्व्ह बँक द अफगाणिस्तान बँकेचं प्रमुख पद आलं आहे.

इदरिसचा फोटो व्हायरल

हाजी मोहम्मद इदरिस याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्यासमोर एका बाजूला लॅपटॉप आहे तर दुसरीकडे AK-47 रायफल ठेवण्यात आली आहे. इदरिस यानं आयुष्यात एकही पुस्तक वाचलेलं नाही. मात्र, आता इदरिस अफगाणिस्तानची बँकिंग सिस्टीम चालवणार आहे.

मोहम्मद इदरिस नेमका कोण?

तालिबाननं सांगितलं की इदरिस सरकारी संस्थांना संघिटत करतील. बँकांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी इदरिस काम करतील. इदरिस हे बँकेत लॅपटॉपसमोर बंदूक घेऊन बसल्यानं ते कशाप्रकार समस्या सोडवणार आहेत याचा अंदाज येत आहे. इदरिस याच्या बँकिंगविषयीच्या ज्ञानाबद्दल सार्वजनिक रित्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्याचं शिक्षण किती झालंय हे देखील माहिती नाही. इदरिस ने धार्मिक पुस्तकं वाचलीत का हे देखील स्पष्ट झालेलं नाही. मात्र, आर्थिक प्रश्नांविषयी जानाकर असल्याचं म्हटलं जातेय.

तालिबान पैसे कसे जमवणार

इदरिस उत्तरेकडील जावजजान प्रांतातील आहे. मुल्ला अक्तर मंसूरसोबत त्यानं बऱ्याच काळापासून तालिबानच्या आर्थिक बाबींवर काम केलं आहे. मुल्ला अख्तरचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात 2016 मध्ये मृत्यू झाला होता. तालिबानच्या दहशतवाद्यांनी इदरिसच्या नियुक्तीद्वारे देशातील बँकांना एक संचलित वित्तीय व्यवस्था हवी असल्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, पैशांची व्यवस्था कशी केली जाणार यासंदर्भात तालिबानकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

तालिाबान सरकार अस्थायी स्वरुपाचं

अफगाणिस्तानमध्ये आता जे तालिबाननं सरकारची घोषणा केलीय ते काळजीवाहू सरकार असेल असं तालिबानच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय. याचाच अर्थ यात काही बदल अपेक्षित आहेत. हे अस्थायी सरकार आहे हेही तालिबाननं स्पष्ट केलंय. ह्या सरकारमध्ये तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये जे कुणी नेते मंत्री होते, त्या सर्वांना स्थान देण्यात आलंय. तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमरच्या मुलालाही मंत्रीमिडळात स्थान आहे.

कोण आहे मुल्ला हसन अखूंद?

मुल्ला हसन अखूंद हा तालिबानचा संस्थापकांपैकी एक आहे. तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. विशेष म्हणजे यूएनची दहशतवाद्यांची जी यादी आहे त्यात मुल्ला हसन अखूंद यांचं नाव आहे. अखूंद हे तालिबानचा जिथं जन्म झाला त्या कंदहारचेच आहेत. गेली वीस वर्ष ते तालिबानसाठी कार्यरत होते. अखूंद यांची ओळख ही मिलिटरी लीडर कमी आणि धार्मिक नेता म्हणून जास्त आहे. अखूंद हे फार खळबळपणे चर्चेत असणारे नेते नाहीत. पण शांत रहावून तालिबानचं त्यांनी अखंडपणे काम केलं. त्यामुळेच ते पंतप्रधानपदी पोहोचल्याचं मानलं जातंय.

इतर बातम्या:

पंतप्रधान जागतिक दहशतवादी तर गृहमंत्र्याच्या डोक्यावर 5 मिलियन डॉलरचं बक्षिस, वाचा अफगाणिस्तानचे टॉप 6 मंत्री

मोठी बातमी ! अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारची घोषणा, मुल्ला हसन अखूंद पंतप्रधान

Afghanistan crisis Haji Mohammed Idrees appointed as chief of The Afganistan Bank

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.