दादरा नगरमध्ये भाजप का हरली?, कलाबेन डेलकरांच्या विजयामागचं कारण काय?; शिवसेनेला बळ मिळणार?

दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला असून शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात प्रवेश केला आहे. (know key points of shiv sena win in dadra and nagar haveli)

दादरा नगरमध्ये भाजप का हरली?, कलाबेन डेलकरांच्या विजयामागचं कारण काय?; शिवसेनेला बळ मिळणार?
kalaben delkar
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 7:25 PM

मुंबई: दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला असून शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला राज्याबाहेरच्या राजकारणात बळ मिळेल काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. तर वाढती महागाई, भाजपविरोधातील रोष आणि कलाबेन यांना असलेली सहानुभूती यामुळे भाजपचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.

कलाबेन यांना प्रचंड मताधिक्य

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी मोठा विजय नोंदवला आहे. कलाबेन यांना एकूण 1,12,741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला.

नेमकं काय घडलं?

कलाबेन यांचे पती मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, नंतर सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीतील प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं होतं. पटेल यांच्या दबावामुळेच आत्महत्या करत असल्याचं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे कलाबेन डेलकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी मुलासह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना पोटनिवडणुकीचं तिकीटही दिलं होतं.

सहानुभूती आणि आक्रोश

मोहन डेलकर हे सातव्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते लोकप्रिय खासदार होते. लोकांमध्ये मिसळणारे होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे येथील मतदारांमध्ये आक्रोश होता. कलाबेन यांना भाजपकडून न्याय न मिळाल्यानेही जनतेत चीड होती आणि कलाबेनबाबत सहानुभूती होती. या सहानुभूतीचाच फायदा कलाबेन यांना झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

हिंदुत्व इकडेही आणि तिकडेही

भाजप ही हिंदुत्ववादी पार्टी आहे. शिवसेनाही हिंदुत्ववादी पक्ष आहे. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची भाजपने म्हणावी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी होती. कलाबेन यांचं कुटुंबही भाजपवर नाराज होतं. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची गळ घातली. ठाकरे यांनीही त्यांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळेच कलाबेन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी असल्याने कलाबेन यांनी शिवसेनेत जाण्याचा घेतलेला निर्णय लोकांना आवडला असावा, त्यामुळेच दादरा नगर हवेलीत वेगळा निकाल लागला असावा, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सायलंट व्होटरची साथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सायलंट व्होटरवर फोकस केला आहे. महिला या देशातील सायलंट व्होटर असल्याचं मोदी सांगतात. याच सायलंट व्होटरनी कलाबेन यांच्या पारड्यात मते टाकल्याचं दिसून येत आहे. कलाबेन यांना महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केल्याचं आता दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या हातून हा सायलंट व्होटर निसटत असल्याचंही दिसत आहे.

त्यांना आणलेलं आवडलं नाही

मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर ही निवडणूक होत होती. त्यामुळे भाजपने स्थानिक नेत्यांच्या मदतीने ही निवडणूक लढवली असती तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. पण भाजपने या निवडणुकीच्या रिंगणात केंद्रीय मंत्र्यांना उतरवले. एवढेच नव्हे तर शिवसेनेवर आगपाखड करण्यासाठी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसांना बोलावलं. ते दादरा नगर हवेलीतील मतदारांना पटलं नाही. एका महिलेला पराभूत करण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा राबवणंच स्थानिकांना आवडलं नाही. त्यामुळेच भाजपला पराभवाला सामोरे जावं लागल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

प्रचार भरकटला, पथ्यावर पडला

मोहन डेलकर यांच्या निधनामुळे येथील मतदारांच्या मनात सहानुभूतीची लाट होती. मात्र, भाजपने या निवडणुकीला पक्षीय रंग दिला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी तळ ठोकून होते. तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कलाबेन यांच्यासाठी प्रचार केला. त्यामुळे फडणवीसांचा संपूर्ण रोख शिवसेनेवर टीका करण्याचा राहिला. परिणामी भाजपचा संपूर्ण प्रचार भरकटला आणि नेमकं तेच कलाबेन यांच्या पथ्यावर पडलं. शिवसेनेनेही भाजपवर टीका केली. पण कलाबेन यांनी पक्षावर टीका करण्याऐवजी त्यांच्यावर झालेला अन्याय लोकांपुढे मांडण्यावर जोर दिला. त्याचा त्यांना फायदा झाल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या:

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

(know key points of shiv sena win in dadra and nagar haveli)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.