पुणे महापालिका निवडणूक : सत्ता राखण्यासाठी फडणवीस मैदानात; राज ठाकरे, अजितदादा, संजय राऊतांकडूनही मोर्चेबांधणी

पुणे महापालिकेवरची भाजपची सत्ता कायम राखण्यासाठी आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय आणि त्यांच्या सोबतीला यंदा पुण्यातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या दोन्ही नेत्यांची पुण्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुणे महापालिका निवडणूक : सत्ता राखण्यासाठी फडणवीस मैदानात; राज ठाकरे, अजितदादा, संजय राऊतांकडूनही मोर्चेबांधणी
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 10:31 PM

पुणे : राज्यातील मुंबईनंतरचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शहर म्हणजे पुणे. याच पुणे शहराची सत्ता काबीज करण्यासाठी राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. पुणे महापालिकेवरची (Pune Municipal Corporation) भाजपची सत्ता कायम राखण्यासाठी आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोर्चेबांधणी सुरु केलीय आणि त्यांच्या सोबतीला यंदा पुण्यातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या दोन्ही नेत्यांची पुण्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपसोबतच मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची पु्ण्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मनसेकडून राज ठाकरे, शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून खुद्द शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. या सर्वच नेत्यांच्या पुण्याच्या वाऱ्या वाढल्या आहेत. पुणे दौऱ्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर जोर दिला जातोय. तसंच शहराच्या पातळीवर संघटनेत मोठे बदलही केले जात आहेत.

राज ठाकरेंचे दोरे आणि संघटनेवर जोर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई-पुणे वाऱ्या वाढल्या आहेत. पुणे शहरातल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका असोत वा पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल, राज ठाकरेंनी पुणे महापालिकेची निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत राज ठाकरे यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला होता. मात्र, राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना तूर्तास भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करु नका, अशी सूचना दिली आहे.

शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसेनेचा जोर

दुसरीकडे पुण्यातल्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत सध्या आघाडीवर आहेत. पुणे पालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल असा दावा ते करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडला आमचा महापौर असेल. असं राऊत म्हणाले होते. यावेळी त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा उल्लेखही त्यांनी केला होता. पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचाही महापौर असावा अशी पुणेकरांचीच इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याचबरोबर राज्यात अनेक पॅटर्न येतात आणि जातात. पण सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला आहे. हा एक चलनी पॅटर्न आहे. दोन प्रमुख पक्ष, त्यात काँग्रेसची सोबत आली तर काय होऊ शकतं हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही मतांचं विभाजन होऊ देणार नाही, असा दावाही राऊत यांनी केला होता.

सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अजितदादा आणि शरद पवार मैदानात

पुणे आणि पिंपरी चिंचवड हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र 2014 साली राज्यात फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजपची सत्ता आल्यावर भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिका ताब्यातून गेल्यानं हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्याचा आढावा घेतात. पुण्यातली विकास कामं, पुणे महापालिकेची हद्द किंवा पुणे शहरातली कोरोनास्थिती या प्रत्येक गोष्टीत अजितदादांचं बारीक लक्ष असतं.

पुणे महापालिकेत पक्षीय बलाबल

>> भाजप – 99

>> राष्ट्रवादी – 45

>> काँग्रेस – 09

>> शिवसेना – 10

>> मनसे – 02

>> अपक्ष – 03

>> एकूण – 168

राज्याची सत्ता हाती असल्यानं जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेनेचा प्रयत्न असेल. तर सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडूनही अटोकाट प्रयत्न केले जातील. मात्र महापालिकेच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी पुण्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघेल यात काही शंका नाही.

इतर बातम्या :

‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा

‘मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो, एसटी अत्यावश्यक सेवेत येते’, अनिल परबांचा सूचक इशारा

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.