AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणेंविरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी, जिल्हा बँकेतील विजयानंतर नारायण राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यावर नितेश राणे हरवला आहे, असा मायना लिहिण्यात आला होता. तसंच नितेश राणेंची माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस देण्यात येण्याची घोषणाही करण्यात आली होती. शिवसेनेच्या या पोस्टरबाजीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलंय.

नितेश राणेंविरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी, जिल्हा बँकेतील विजयानंतर नारायण राणेंचं जोरदार प्रत्युत्तर
नितेश राणेंविरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 10:17 PM
Share

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurga Bank Election) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार झटका देत भाजपलं दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, या निवडणूक निकालापूर्वी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात मुंबईत शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यावर नितेश राणे हरवला आहे, असा मायना लिहिण्यात आला होता. तसंच नितेश राणेंची माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस देण्यात येण्याची घोषणाही करण्यात आली होती. शिवसेनेच्या या पोस्टरबाजीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलंय.

पोस्टरवर नेमकं काय?

हरवला आहे….नाव, नितेश नारायण राणे उंची, दीड फूट…रंग गोरा वर्णन, डोळे नेपाळ्यासारखे…डोक्याने मंद माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस देण्यात येईल

नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर या पोस्टरबाजीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. येत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय आम्हाला, असे सूचक विधान यावेळी नारायण राणे यांनी केले आहे. तसेच शिवसेनेवर टीका करताना राणेंनी, हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत, राज्याचा कारभार करण्याच्या लायकीचे नाहीत. आता एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन लावत फिरा, असा टोला राणेंनी सेनेला लगावलाय.

शाब्दिक लढाई आता पोस्टरबाजीवर

जिल्हा बँक निवडणुकी दरम्यान संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, ते अद्यापही पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. त्यावरुन नितेश राणे हरवले आहेत, असे पोस्टर्स शिवसेनेनं लावले आहेत. याविरोधात भाजपकडून माटूंगा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आलीय. तर मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात पोस्टर्स लागल्यानंतर, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं नितेश राणेंच्या समर्थनात पोस्टर्स लावले आहेत. त्यावर जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजेत, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेनेतील शाब्दिक लढाई आता, पोस्टरवर आल्याचं पाहायला मिळतंय.

इतर बातम्या :

राड्यानंतरही गड राखला, जिल्हा बँकेवर राणेंचेच वर्चस्व; निकालाची सहा वैशिष्ट्ये काय? वाचा सविस्तर

अर्थमंत्री येऊन पराभव करून जातात, याला अक्कल म्हणतात; राणेंचा अजितदादांना टोला

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.