World Population Day : बेसुमार लोकसंख्या वाढ हा भस्मासूरच, ज्यांनी ताडले आणि त्यावर उपायांनी साधले तेच जन धन्य!

जर मी पंतप्रधान झाले तर मी असा आदेश देईन की कुणी लग्नच करायचं नाही. यावर अचंबित होऊन आई-बाबांनी सहाजिक प्रश्न केला, कागं? त्यावर माझं त्यावेळचं बालीश उत्तर होतं की, लग्नच केलं नाही तर लोकसंख्या वाढणार नाही आणि मग लोक संख्या वाढली नाही तर लोकांना व्यवस्थित जेवण मिळेल!

World Population Day : बेसुमार लोकसंख्या वाढ हा भस्मासूरच, ज्यांनी ताडले आणि त्यावर उपायांनी साधले तेच जन धन्य!
लोकसंख्या (प्रातिनिधिक फोटो)Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 11:33 PM

प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक, मुंबई : मी साधारण तिसरीत असताना म्हंटलं होतं की, जर मी पंतप्रधान झाले तर मी असा आदेश देईन की कुणी लग्नच (Marriage) करायचं नाही. यावर अचंबित होऊन आई-बाबांनी सहाजिक प्रश्न केला, कागं? त्यावर माझं त्यावेळचं बालीश उत्तर होतं की, लग्नच केलं नाही तर लोकसंख्या (Population) वाढणार नाही आणि मग लोक संख्या वाढली नाही तर लोकांना व्यवस्थित जेवण मिळेल! कारण ‘लोकसंख्या वाढीमुळेच’ अनेक लोकांना उपाशी राहावं लागतं असं माझ्याच वयाच्या भावानं मला सांगितलं होतं. आता या माझ्या तर्कावर घरी सगळेच हसले होते. आणि अशाने लोकसंख्या नियंत्रणात (Population Control) येत नाही इतकेच सांगितले होते. (व मी आयुष्यात कधीच राजकारणात जाऊ शकत नाही याची घरच्यांना खात्री पटली होती..) विनोदाचा भाग सोडा, पण आज हे आठवण्याचं कारण म्हणजे ‘जागतिक लोक संख्या दिन’!

1804 साली जगाची लोकसंख्या 1 अरब होती जी आज 2022 रोजी 7.9 अरब झालीय. जागतिक लोक संख्या दिनानिमित्त सध्या जगाची लोकसंख्या भरभक्कम प्रमाणात वाढत आहे. आता ही स्थिती खरच चिंताजनक आहे का? तर, ज्या देशांमधे लोकसंख्या नियंत्रणात आहे तिथे तसा प्रश्न नाही. पण काही देशांसाठी हो, कारण जिथे बेसुमार लोकसंख्या वाढत आहे त्या प्रांतासाठी अनेक प्रश्न आवासून उभे राहतात. सर्वसामान्य जीवन जगताना आपण त्या प्रश्नांना अनेकदा सामोरेही जातो, पण त्यामागचे हेच मुख्य कारण आहे, यापासून अनभिज्ञ असतात. काही कारणांचा आढावा घेऊया…

  1. लोकसंख्या नियंत्रण हे आजवर अनेक देशांना न उमगलेलं कोडंच आहे.
  2. नागरिक शास्त्र हा तसा शाळेत असताना कधीही न समजलेला विषयही इथे खूप महत्त्वाचा आहे.
  3. प्रत्येक नागरिकाची मुलभूत गरज अन्न-वस्त्र-निवारा आहे. व ती पूर्ण होत नसेल तर ती पूर्ण करणे ही मुख्य जबाबदारी प्रशासनाची, सरकारची आहे.
  4. देशाच्या विकासासाठी समाजाचा विकास पर्यायानं देशातील सर्व नागरिकांचा विकास अपनेक्षित आहे.
  5. यासाठी मुलभूत सुविधा सर्व घटकांपर्यंत पोहोचणं हे प्रमुख उद्दीष्ट
  6. या मध्ये मुलभूत सुविधांसोबतच, बाल संगोपन, योग्य पोषण, आरोग्य, शिक्षण, तंत्र शिक्षण, विद्यालय-महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी उपयुक्त शिक्षण, नोकऱ्यांची उपलब्धता अशा सर्व बाबी यामध्ये येतात.
  7. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च कोणालाही कर्जाच्या खाईत लोटतो, हेच गणित इथेही लोगू होतं
  8. आता लोकसंख्या जर नियंत्रणात असेल तर या सर्व बाबींची पूर्तता विनासायास करणं प्रशासनाला शक्य आहे.
  9. मात्र लोकसंख्या ठरते कशी, तर ती क्षेत्रफळाच्या आधारावर, त्यामुळे कमी क्षेत्रफळ आणि जास्त लोकसंख्या हे मोठं आव्हानच.
  10. जसं घरात बजेट 2 हजार रुपयांचं असेल आणि खर्च अचानक वाढून 5 हजारावर गेला की बजेटचे तीनतेरा वाजतात. तसंच
  11. लोकसंख्या नियंत्रित नसेल तर सुविधा सर्वांपर्यंत पेहोचत नाहीत. पर्यायानं बहुसंख्य समाज उपेक्षित राहतो. आणि उपेक्षित घटकांची असंतुष्टता वाढते.
  12. समाजाची शांती ही त्यांच्या संतुष्टतेतच असते.
  13. असंतुष्ट समाज हे कोणत्याही देशाच्या स्थिरतेला मारक.
  14. अनियंत्रित लोकसंख्येचा भस्मासूर, आणि प्रांताची अल्प कमाई हे समीकरण त्या प्रांतांचा घातच करतो, हे त्रीवार सत्य आहे.

स्वतःला कर्तृत्ववान समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने विचार करणे गरजेचे

त्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या नियंत्रण हा प्रश्न जटिल होत चाललाय. यावर उपाय आहेत. भारता सारख्या देशानं अनेक उपाययोजनाही राबवल्या आहेत. आता या विषयावर केवळ एका-दुसऱ्याने नव्हे तर स्वतःला कर्तृत्ववान समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनेच विचार करणे आणि लोकसंख्ये बाबत तरी ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीला साजेसे वागण्याची अवश्यकता आहे. तसे न झाल्यास कितीही कमाई केली तरी ती तोकडीच पडणार, ‘बेसुमार लोकसंख्या वाढ’ हा भस्मासूरच आहे हे ज्यांनी ताडले व त्यावर उपायांनी साधले तेच जन धन्य!

(लेखिका टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीत वृत्त निवेदिका म्हणून काम करतात) 

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....