AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sholay 50 Years : ऐतिहासिक ‘शोले’ चित्रपटात काम करणाऱ्या आतापर्यंत किती कलाकारांचा झालाय मृत्यू?

50 Years of Sholay Movie : यंदाचा 15 ऑगस्ट भारतीयांसाठी दोन कारणांमुळे खास आहे. एक म्हणजे 79 वा स्वातंत्र्यदिन आणि दुसरीकडे बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेच्या रिलीजला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला, त्या काळातला सुपरहिट फिल्म होती. हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला.

| Updated on: Aug 15, 2025 | 3:19 PM
Share
50 वर्ष एक मोठा काळ झाला. आतापर्यंत या चित्रपटात काम केलेल्या निम्म्यापेक्षा अधिक कलाकारांनी जगाचा निरोप घेतलाय. पण आजही या चित्रपटाची तशीच चमक कायम आहे. लोक या चित्रपटावर भरपूर प्रेम करतात. जाणून घेऊया शोले चित्रपटाच्या कुठल्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतलाय.

1 / 10
अमजद खान यांनी बॉलीवुडचा रुपेरी पडदा गाजवला. शोलेमधल्या त्यांच्या गब्बर या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांवर अशी छाप उमटवली की, आज लोक त्यांना याच रोलसाठी ओळखतात. चित्रपटाच्या पूर्ण कास्टवर ते भारी पडले. 1992 साली वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

2 / 10
संजीव कुमार - शोलेच्या ठाकूर यांना कोण विसरु शकतं?. संपूर्ण चित्रपटात त्यांनी दमदार परफॉर्मन्स दिला. काही सीन्समध्ये त्यांची ठाकूरची व्यक्तीरेखा गब्बरवर भारी पडली. संजीव कुमार इंडस्ट्रीमधले सर्वात  वर्सेटाइल एक्टर मानले जातात. 1985 साली वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

3 / 10
जगदीप - शोले चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखा खास होती. या फिल्ममध्ये महान कॉमेडियन जगदीप यांनी सुद्धा महत्वाचा रोल प्ले केलेला. त्यांनी सूरमा भोपालीचा रोल केलेला. प्रेक्षकांना ही व्यक्तीरेखा खूप आवडलेली.  वर्ष 2020 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

4 / 10
एके हंगल - शोलेमध्ये इमाम साहेबांचा रोल साकारणारे एके हंगल आता या जगात नाहीत. त्यांनी पाच दशकं चित्रपट सृष्टीत काम केलं. अनेक संस्मरणीय रोले केले. वर्ष 2012 साली त्यांनी शेवटच्या चित्रपटासाठी काम केलं. या चित्रपटाला त्यांनी आवाज दिलेला. वर्ष 2012 मध्ये वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

5 / 10
लीला मिश्रा- भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या चरित्र व्यक्तीरेखांनी त्यांनी प्रेक्षकांच भरपूर मनोंरजन केलं. लीला मिश्रा यांनी सुद्धा शोले चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेली. मौसीचा रोल त्यांनी साकारलेला. हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचे सीन्स खूप हिट झालेले. त्यावेळी त्या सीनियर एक्ट्रेस होत्या. वर्ष 1988 साली वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

6 / 10
मॅक मोहन - अनेक चित्रपटात विलनच्या रोलमध्ये दिसलेल्या मॅक मोहन यांना शोलेमधल्या सांभाच्या रोलसाठी जास्त प्रसिद्धी मिळाली. आपल्या करिअरमध्ये त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलय. तो नात्यात रवीन टंडनचा मामा लागायचा. 2017 साली वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

7 / 10
सत्येन कप्पू - सत्येन कप्पू यांचं नाव कदाचित लोकांना माहित असेल. पण त्यांचा चेहरा लक्षात असेल. शोले फिल्ममध्ये त्यांनी ठाकूरच्या घरी  नोकर रामलालचा रोल प्ले केलेला. सत्येन यांनी आपल्या करिअरमध्ये 400 चित्रपटात काम केलं. 2007 साली वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

8 / 10
ओम शिवपुरी - ओम शिवपुरी यांना कोण ओळखत नाही. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 200 चित्रपटात भूमिका साकारल्या. शोलेमध्ये त्यांनी इंस्पेक्टरचा रोल केलेला.  ओम शवपुरी यांचं निधन 1990 साली वयाच्या  52 वर्षी झालं. त्यांनी सुद्धा कमी वयात जगाचा निरोप घेतला.

9 / 10
त्या शिवाय शोले चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणारे  केस्टो मुखर्जी, विजू खोटे, इफ्तेकार, अरविंद जोशी, मुस्ताक मर्चेंट, जलाल आगा, राज किशोर आणि हबीब सारख्या 8 कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.

10 / 10
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.