वैवाहिक बलात्कारावर आधारित 6 भागांची सीरिज, जी OTT येताच बनली नंबर 1

सध्या प्रेक्षकांना मनोरंजन आणि अॅक्शन चित्रपट किंवा सीरिज आवडत नाहीत तर प्रेक्षकांना चांगली कथा असणारा चित्रपट आणि सीरिज प्रचंड आवडत आहेत. अशातच एका सीरिजने प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

| Updated on: Mar 22, 2026 | 9:14 AM
1 / 6
आजच्या काळात मनोरंजन हे केवळ टाइमपासचे साधन राहिलेले नाही तर प्रेक्षक आता वास्तवाशी जोडलेले आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारे चित्रपट पाहण्यास अधिक प्राधान्य देत आहेत.

2 / 6
अशा प्रकारच्या विषयांमुळे समाजात जागरूकता वाढते आणि विविध संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा घडते. विशेषतः तरुण पिढी अशा चित्रपट आणि सीरिजकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.

3 / 6
याच पार्श्वभूमीवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'चिरैया' ही वेब सिरीज सध्या ओटीटीवर चांगलीच चर्चेत आली आहे. 20 मार्च 2026 रोजी Jio Hotstar वर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने येताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिग्दर्शक शशांत शाह यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

4 / 6
सीरिजमध्ये एकूण 6 भाग असून प्रत्येक भाग सुमारे 30 ते 35 मिनिटांचा आहे. कमी भागांमध्येही कथा प्रभावीपणे मांडण्यात आली असून कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे सीरिज अधिक लोकप्रिय ठरत आहे.

5 / 6
‘चिरैया’ची कथा एका आदर्श सूनबाईभोवती फिरते, जी आपल्या देवर वर त्याच्या पत्नीने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर त्याच्याविरोधात उभी राहते. न्यायासाठी लढताना ती स्वतःच्या सासऱ्याविरुद्धही उभी ठाकते. जे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात.

6 / 6
कथेतील एक धक्कादायक वळण असेही आहे की, आरोप करणाऱ्या सूनबाईच्या वडिलांवर दबाव आणण्यासाठी सासरे त्यांना झोपेच्या गोळ्या देतात. यामुळे कथानक अधिक थरारक अधिक लक्षवेधी ठरते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us