मराठी बातमी » फोटो गॅलरी » PHOTO | डोक्यावर कमी केस, डोळ्यावर गोल भिंगाचा चष्मा, ‘बॉब बिस्वास’मध्ये अभिषेक बच्चनचा नवा लूक
PHOTO | डोक्यावर कमी केस, डोळ्यावर गोल भिंगाचा चष्मा, ‘बॉब बिस्वास’मध्ये अभिषेक बच्चनचा नवा लूक
अभिनेता अभिषेक बच्चन ‘बॉब बिस्वास’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. (Abhishek Bachchan new look).
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Published On -
23:00 PM, 25 Nov 2020
सध्या चित्रपटाचं कोलकातामध्ये चित्रीकरण सुरु आहे. चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन याचा नवा लूक समोर आला आहे. डोक्यावर कमी केस, पोट बाहेर आलेलं, डोळ्यावर गोल भिंगाचा चष्मा यामुळे अभिषेकला ओळखणं कठीण आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन ‘बॉब बिस्वास’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोलकातामध्ये सुरुवात झाली आहे.
‘बॉब बिस्वास’ चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक सोबत अभिनेत्री चित्रागंदा सिंह या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सध्या चित्रपटाचं कोलकातामध्ये चित्रीकरण सुरु आहे. चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन याचा नवा लूक समोर आला आहे. डोक्यावर कमी केस, पोट बाहेर आलेलं, डोळ्यावर गोल भिंगाचा चष्मा यामुळे अभिषेकला ओळखणं कठीण आहे.
दुसरीकडे चित्रागंदा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
अभिषेकने सोशल मीडियावर आपण कोलकाताला जाणार असल्याची माहिती दिली होती. तो 9 डिसेंबरपर्यंत कोलकातामध्ये चित्रीकरणासाठी थांबणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं हे दुसऱ्या टप्प्यातील चित्रीकरण आहे. याआधी नऊ महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण पार पडलं होतं.
बॉब बिस्वास या चित्रपटाचे गौरी खान, सुजॉय घोष आणि गौरव वर्मा हे निर्माते आहेत. तर दिया घोष या चित्रपटाची दिग्दर्शक आहे. सुजॉय घोष यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. बॉब बिस्वास कधी प्रदर्शित होणार याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण अभिषेकचा नवा लूक पाहून चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता
नक्कीच लागेल.