AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 एपिसोड्सची अमृता खानविलकरची वेब सीरिज; 6 महिन्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम, प्रत्येक भागात थरार

जवळपास सहा महिन्यांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज अजूनही टॉप 10 ट्रेंडिंग यादीत कायम आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अमृता खानविलकरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

| Updated on: Jun 10, 2026 | 9:14 AM
Share
ओटीटी प्लॅटफॉर्मवर कितीही दमदार वेब सीरिज असली तरी एक किंवा दोन महिन्यांनंतर ती ट्रेंडिंग यादीतून बाहेर निघून जाते. परंतु नेटफ्लिक्सवर अशी एक वेब सीरिज आहे, जी गेल्या सहा महिन्यांपासून टॉप 10 ट्रेंडिंगच्या यादीत कायम आहे. जेव्हा ही सीरिज प्रदर्शित झाली होती, तेव्हा तर ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाली होती.

1 / 5
गेल्या सहा महिन्यात अनेक नवीन वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. तरी टॉप 10 ट्रेंडिंगच्या यादीतून ही सीरिज बाहेर गेली नाही. ही वेब सीरिज प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की आयएमडीबीवरही त्याला चांगली रेटिंग मिळाली आहे. इंटरनेट डेटा बेसने या सीरिजला 10 पैकी 7.1 रेटिंग दिली आहे.

2 / 5
या सीरिजची कथा एका निलंबित पण तत्त्वनिष्ठ सीमाशुल्क अधिकाऱ्याभोवती फिरते. त्याला एका आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीविरुद्ध विशेष कृती दलाचं नेतृत्त्व करण्यासाठी पुन्हा नियुक्त केलं जातं. हे पथक सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सच्या सहाय्यक आयुक्तांनी तयार केलेलं असतं. या पथकात अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांना भ्रष्टाचारात सामील होण्यास नकार दिल्यामुळे बाजूला सारण्यात आलं होतं.

3 / 5
या सीरिजचा प्रत्येक एपिसोड थराराने भरलेला आहे आणि कथाकथनाची शैली तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. तर सीरिजचं क्लायमॅक्स चकीत करणारं आहे. यातील कलाकारांचा अभिनयही अप्रतिम आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवणाऱ्या या सीरिजचं नाव 'तस्करी: द स्मगलर्स वेब' असं आहे.

4 / 5
ही वेब सीरिज 14 जानेवारी 2026 रोजी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि तेव्हापासून ती ट्रेंडिंग यादीत आपलं स्थान टिकवून आहे. यामध्ये इमरान हाश्मीने कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर शरद केळकर, अमृता खानविलकर, नंदीश संधू, अनुराग सिन्हा आणि झोया अफरोज यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...