AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागड्या लिंबाला म्हणा बाय बाय, शरीराला कूल ठेवण्यासाठी स्वस्त पर्याय काय?

वाढत्या तापमानासोबतच लिंबाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. लिंबू महाग झाले असले तरी कोकम, ताक, कैरीचे पन्हे आणि आवळा यांसारख्या स्वस्त आणि नैसर्गिक पर्यायांनी तुम्ही उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकता. अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

| Updated on: Apr 29, 2026 | 12:48 PM
Share
राज्यासह देशभरात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेले नागरिक थंडाव्यासाठी लिंबू सरबताचा आधार घेतात. मात्र, वाढत्या मागणीमुळे लिंबाच्या दराने उच्चांक गाठला आहे.

राज्यासह देशभरात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेले नागरिक थंडाव्यासाठी लिंबू सरबताचा आधार घेतात. मात्र, वाढत्या मागणीमुळे लिंबाच्या दराने उच्चांक गाठला आहे.

1 / 8
किरकोळ बाजारात सध्या एका लिंबासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशा परिस्थितीत लिंबाला पर्याय देऊन तुम्ही काही नैसर्गिक आणि स्वस्त पर्यायांचा वापर करून उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकता.

2 / 8
कोकणची ओळख असलेले कोकम सरबत पित्तशामक आणि शरीरातील उष्णता शोषून घेणारे आहे. तसेच, कच्च्या कैरीचे पन्हे उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते.

कोकणची ओळख असलेले कोकम सरबत पित्तशामक आणि शरीरातील उष्णता शोषून घेणारे आहे. तसेच, कच्च्या कैरीचे पन्हे उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रामबाण उपाय मानले जाते.

3 / 8
ताक हे खिशाला परवडणारे अमृत म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात दह्यापासून बनवलेले ताक हे सर्वोत्तम पेय आहे. यामध्ये जिरे पूड आणि काळे मीठ टाकल्यास ते केवळ शरीराला थंडावाच देत नाही, तर पचनशक्ती देखील सुधारते.

4 / 8
उन्हाळ्याच्या दिवसात बेल फळाचे सरबत अत्यंत गुणकारी ठरते. हे पोटाचे विकार दूर ठेवते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करते.

उन्हाळ्याच्या दिवसात बेल फळाचे सरबत अत्यंत गुणकारी ठरते. हे पोटाचे विकार दूर ठेवते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करते.

5 / 8
लिंबाला व्हिटॅमिन 'सी'चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे आवळा. आवळ्याचा रस नियमित घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि कडक उन्हातही उत्साह टिकून राहतो.

लिंबाला व्हिटॅमिन 'सी'चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे आवळा. आवळ्याचा रस नियमित घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि कडक उन्हातही उत्साह टिकून राहतो.

6 / 8
यासोबतच नैसर्गिक थंडावा देणारे वाळ्याचे सरबत किंवा गुलकंदाचे सरबत घेतल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. तसेच उन्हामुळे होणारी जळजळ कमी होते.

यासोबतच नैसर्गिक थंडावा देणारे वाळ्याचे सरबत किंवा गुलकंदाचे सरबत घेतल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. तसेच उन्हामुळे होणारी जळजळ कमी होते.

7 / 8
त्यामुळे लिंबू महाग झाले असले तरी निसर्गात उपलब्ध असलेल्या या पर्यायांचा वापर करून तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकता.

त्यामुळे लिंबू महाग झाले असले तरी निसर्गात उपलब्ध असलेल्या या पर्यायांचा वापर करून तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकता.

8 / 8
Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे