Marathi News » Photo gallery » Chanakya Niti Before starting a new business know these important things know more
Chanakya Niti | रिस्क हैं तो इश्क हैं ! व्यवसाय सुरू करताय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी पाहाच
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. आयुष्यातील खूप महत्त्वाची प्रश्नाची उत्तरे आपल्याला चाणक्यानीतीमध्ये मिळू शकतात. जर तुम्ही व्यवसाय सुरू करतातय तर या काळात तुम्हाला भासणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आचार्य चाणक्यांनी दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
आचार्य चाणक्यांनी बनवलेली धोरणे आजच्या युगात पूर्वीसारखीच उपयुक्त आहेत. आचार्य चाणक्यांनी तुमच्या आयुष्यात यशस्वी कसे व्हावे, चांगला व्यापार कसा करावा याबद्दल अनेक गोष्ट सांगितल्या आहे.
1 / 6
आचार्य चाणक्य यांनी सकारात्मक विचार ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपले विचार स्थिर आणि सकारात्मक असले पाहिजेत. नकारात्मक विचाराने फार पुढे जाता येत नाही. सकारात्मक विचाऱ्यांनी तुम्ही आयुष्यात खूप पुढे जावू शकता.
2 / 6
तुम्ही जे काम सुरू करणार आहात ते करण्यास तुम्ही सक्षम आहात की नाही हे आधी तपासून पाहा. तुम्ही ते नीट करू शकत नसाल तर आयुष्यात दुसरा पर्याय तयार ठेवा. तुम्हा प्लॉन बी तयार ठेवणं नेहमी गरजेचं असतं.
3 / 6
नवीन काम सुरू करताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चाणक्यच्या मते, जर तुम्ही तिखट आणि कडू बोलले तर तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार, जेव्हाही तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी तेव्हा ते बाहेरील व्यक्तीला तुमचे विचार कधीही कळू देवू नका.
4 / 6
चाणक्य नीतीनुसार, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही कठोर आणि अनिश्चित निर्णय देखील घ्यावे लागतील. जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही.
5 / 6
काम सुरू करण्यापूर्वी, वेळ, ठिकाण आणि या कामात कोण कोण सहभागी आहे आणि कोण तुम्हाला मदत करू शकेल याची खात्री करा. या गोष्टीमध्ये विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे.