बॉयफ्रेंडसोबत लिव्हइनमध्ये राहते ‘बिग बॉस ओटीटी’ची ‘ही’ अभिनेत्री, लग्न न करण्याचे कारण सांगताना म्हणाली…

अभिनेता वरुण सूद (Varun Sood) सध्या टीव्ही रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 11' मध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्याची मैत्रीण दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg boss OTT) दिसणार आहे.

1/5
अभिनेता वरुण सूद (Varun Sood) सध्या टीव्ही रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 11' मध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्याची मैत्रीण दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) बिग बॉस ओटीटीमध्ये  (Bigg boss OTT) दिसणार आहे. दिव्याला तिच्या बॉयफ्रेंड वरूण याच्या सूदसोबत पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये लग्न करायचे आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिला आणि वरुणला लग्न करण्यापूर्वी घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

2/5
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिव्या अग्रवाल म्हणाली, आम्ही दोघेही खूप भावनिक आहोत. पण, त्याचवेळी आम्ही दोघेही स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. तो शो मध्ये काम करत आहे आणि पैसे कमवत आहे. आता माझी वेळ आहे. आमचे फक्त एक छोटे स्वप्न आहे.

3/5
आम्हाला एका सुंदर घरासह इथेच स्थायिक व्हायचे आहे. आम्ही दोघेही त्याचसाठी कष्ट करत आहोत. आम्ही आमच्या स्वप्नांबद्दल आणि आमच्या कामाबद्दल खूप गंभीर आहोत. मला वाटते की याच गोष्टी आपल्याला मजबूत बनवतात आणि एकत्र बांधून ठेवतात, असे दिव्या म्हणाली.

4/5
सध्या वरुण आणि दिव्या लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. दिव्या म्हणते, “लिव्ह-इनमध्ये असणे खूप मजा आहे. लग्न खूप वेगळं आहे आणि आत्ता आपल्याला ताण देणाऱ्या कोणत्याही गोष्टीत पाऊल टाकायचंय नाही. आम्हाला आता इतक्यात लग्न करायचे नाहीय. लग्नाआधी सर्वकाही व्यवस्थित ठरवायचे आहे. पुढच्या वर्षापर्यंत आम्ही पूर्णपणे तयार होऊ आणि मगच लग्न करू."

5/5
रविवारी (8 ऑगस्ट) रात्री 'बिग बॉस ओटीटी'चा भव्य प्रीमियर होता.  परंतु, शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये घरातील स्पर्धकांपैकी एक अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिला घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकित करण्यात आले होते. आता दिव्याकडे 1 आठवड्याचा वेळ आहे. या दरम्यान, तिला प्रेक्षकांची मने जिंकावी लागतील, तरच ती घराच्या आत राहू शकणार आहे. करण जोहर 'बिग बॉस ओटीटी' होस्ट करत असून, एकूण 13 स्पर्धकांनी या शोमध्ये भाग घेतला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI