Marathi News » Photo gallery » Cinema photos » Happy Birthday Vidya Balan The struggling start of her career, the role of 'Silk Smita' made Vidya Balan famous
विद्या बालनचा वाढदिवस वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला असतो. 'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्किया' आणि 'पा' यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारलेल्या विद्या बालनला एकेकाळी आपल्याला चित्रपटांच्या ऑफर्स मिळणार नाहीत याची काळजी वाटत होती.
विद्या बालनचा वाढदिवस वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला असतो. 'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्किया' आणि 'पा' यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारलेल्या विद्या बालनला एकेकाळी आपल्याला चित्रपटांच्या ऑफर्स मिळणार नाहीत याची काळजी वाटत होती.
1 / 6
विद्या बालनचा जन्म मुंबईतील चेंबूर येथे एका तमिळ कुटुंबात झाला. विद्याने वयाच्या 16 व्या वर्षी एकता कपूरच्या टीव्ही सीरियल 'हम पांच'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, परंतु विद्याला तिचे करिअर चित्रपटांमध्ये करायचे होते. मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अनेक प्रयत्न करूनही ती अपयशी ठरली होती.
2 / 6
हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवलेल्या विद्या बालनला दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, जेव्हा ती सुरुवातीला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी धडपडत होती. मात्र, हा चित्रपट काही कारणास्तव रखडला आणि यासाठी विद्या बालनला जबाबदार धरण्यात आले आणि तिला वाईटही म्हटले गेले.
3 / 6
'हे बेबी' आणि 'किस्मत कनेक्शन' या चित्रपटांमधील तिचे वाढलेले वजन आणि विद्याच्या आउटफिटमुळे तिच्यावर खूप टीका झाली होती. यामुळे विद्या इतकी निराश झाली की, तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिच्या करिअरच्या सुरुवातीला 'परिणीता' आणि 'मुन्ना भाई...' सारख्या चित्रपटांसाठी विद्याचे खूप कौतुक झाले होते.
4 / 6
तिने बॉलिवूडमध्ये 'लगे रहो मुन्ना भाई', 'गुरु’ आणि सलाम-ए-इश्क' सारखे अनेक हिट चित्रपट दिले. पण, 2011 मध्ये आलेल्या 'द डर्टी पिक्चर' चित्रपटाने तिचे नशीब बदलले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विद्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारणे माझ्यासाठी थोडे कठीण होते. आम्हा दोघींचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे भिन्न होते.
5 / 6
विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले आहे. दोघांची पहिली भेट फिल्मफेअर अवॉर्ड्सदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी 14 डिसेंबर 2012 रोजी लग्न केले.