Marathi News » Photo gallery » Cinema photos » The wait is over, Amitabh Bachchan's show 'Kaun Banega Crorepati 13' schedule released Find out when and from what time KBC will come
KBC 13 Schedule: प्रतिक्षा संपली, अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ चं वेळापत्रक जारी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN
Updated on: Aug 11, 2021 | 11:48 AM
नेहमी प्रमाणे, यावेळी देखील, कौन बनेगा करोडपतीचा 13 वा सीझन मेगास्टार अमिताभ बच्चन होस्ट करताना दिसणार आहेत. (The wait is over, Amitabh Bachchan's show 'Kaun Banega Crorepati 13' schedule released)
Aug 11, 2021 | 11:48 AM
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' च्या प्रत्येक नवीन सीझनची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ‘कौंन बनेगा करोडपती’ हा शो चाहत्यांसाठी सज्ज झाला आहे. केबीसीच्या 13 व्या हंगामाची प्रतीक्षा संपली आहे. या शोची ऑडिशन फेरी पूर्ण झाली असून आता शोच्या निर्मात्यांनी त्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
1 / 6
नेहमी प्रमाणे, यावेळी देखील, कौन बनेगा करोडपतीचा 13 वा सीझन मेगास्टार अमिताभ बच्चन होस्ट करताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या होस्टिंगमुळे शो नेहमीच आकर्षक बनतो.
2 / 6
चाहत्यांचा आवडता शो 'कौन बनेगा करोडपती 13' (KBC) या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे. केबीसी 23 ऑगस्ट 2021 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. सोनीच्या वतीनं ट्विट करून याबाबत अधिकृत माहिती शेअर करण्यात आली आहे.
3 / 6
नेहमीप्रमाणे या वर्षीही केबीसी आठवड्यात पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होईल. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजननं आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रोमो शेअर करून संपूर्ण वेळापत्रक शेअर केले आहे.
4 / 6
शोचे प्रोमो यावेळी खास पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. यावेळी प्रोमोमध्ये एक कथा सादर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, शो प्रसारित होण्यापूर्वीच, ते प्रोमोद्वारे कव्हर केलं गेलं आहे.
5 / 6
कौन बनेगा करोडपती हा क्विझवर आधारित शो आहे, या शोमध्ये देशाच्या विविध भागांतील स्पर्धकांची निवड त्यांच्या ज्ञानाच्या आधारावर केली जाते. त्यानंतर हे स्पर्धक हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर गेम खेळतात. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सर्व योग्य प्रश्नांची उत्तरे दिल्यास स्पर्धक 7 कोटींपर्यंतची रक्कम जिंकू शकतात. गेल्या हंगामात, चार लोक करोडपती झाले होते.