AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli : सिद्धिविनायक मंदिरातील चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, दर्शनाच्या बहाण्याने आला आणि…

डोंबिवलीत चोरट्याचा अजब कारभार समोर आला आहे. काठीला गम लावून मंदिरातील दानपेटीवर त्याने डल्ला मारला आणि पैसे चोरी केले. पण , भाविक आणि मंदिर प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे या चोरट्याचा डाव फसला असून त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

| Updated on: May 15, 2026 | 12:17 PM
Share
डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी भागातील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका चोरट्याने चक्क काठीला 'गम' (डिंक) लावून दानपेटीतील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. सध्या घटनेचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत.

1 / 5
भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील सिद्धिविनायक मंदिरात शुक्रवारी सकाळी चोरीची घटना घडली. एका चोरट्याने दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटीतील रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला.

2 / 5
मात्र, सीसीटीव्ही आणि जागरूक भाविकांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.आज सकाळी ६:३४ वाजण्याच्या सुमारास हा चोरटा मंदिरात आला. त्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून दर्शनाचे नाटक केले. त्यानंतर, सोबत आणलेल्या एका बारीक काठीला डिंक लावून तो दानपेटीच्या फटीतून नोटा चिटकवून बाहेर काढू लागला.

3 / 5
 ही चोरीची पद्धत अत्यंत निराळी होती.चोरट्याची ही हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याचवेळी दर्शनासाठी आलेले श्री. पांडुरंग उडे आणि मंदिराचे खजिनदार श्री. चंद्रशेखर शिंदे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी कसलाही वेळ न घालवता अत्यंत हुशारीने या चोरट्याला जागीच पकडले.

4 / 5
चोरट्याने काठीच्या साहाय्याने दानपेटीतील बरीच रक्कम आधीच बाहेर काढली होती.चोरट्याला पकडल्यानंतर तात्काळ मानपाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मानपाडा पोलीस आता या चोरट्याची सखोल चौकशी करत असून, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे चोरी केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

5 / 5
Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा