IMD Weather Update : ताशी 125 किमी वेगानं चक्रीवादळाचं संकट; अतिमुसळधार पावसाचा इशारा, आयमडीची मोठी अपडेट
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम राजस्थान, पूर्वोत्तर आसाम आणि पूर्वोत्तर बांग्लादेश या भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, वाऱ्याचा वेग प्रती तास 125 किमी एवढा आहे.

- भारतीय हवामान विभाग (IMD) कडून हवामानाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे. पुढील महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागू शकते.
- यंदा थंडी वेळेपूर्वी निरोप घेण्याची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
- हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम राजस्थान, पूर्वोत्तर आसाम आणि पूर्वोत्तर बांग्लादेश या भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, वाऱ्याचा वेग प्रती तास 125 किमी एवढा आहे.
- निर्माण झालेल्या या चक्रीवादळ सदृष्य स्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जम्मू -काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाऊस झाला आहे.
- दरम्यान स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.
- अरुणाचल सोबतच आज आसाम, सिक्किम आणि उत्तराखंड, तसेच हिमाचल प्रदेशमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो.
- तर दुसरीकडे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात हवामानात फार बदल होणार नाहीये, थोडसं तापमान वाढण्याचा अंदाज आहे.