स्वर्गात जाण्यासाठी…, खास फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?
अभिनेत्री काजोल हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल चर्चेत आली आहे.

- अभिनेत्री काजोल हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
- काजोल हिने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत काजोलने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे.
- फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘स्वर्गात जाण्यासाठी दार आहे की जिना आहे? तुम्हाला माहिती आहे का?’ असं लिहिलं आहे.
- अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
- आजही चाहत्यांमध्ये अभिनेत्री काजोल हिची क्रेझ कायम आहे. अनेक सिनेमांमधून काजोल चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.





