Photos | मॉडेलिंग करणाऱ्या ‘या’ अस्वलापुढे मॉडेलही फिक्या, किस करतानाचे रोमँटिक फोटो व्हायरल
आपण नेहमीच अनेक सुंदर तरुण-तरुणींना मॉडेलिंग करताना पाहतो. मात्र, तुम्हाला जर कुणी एक अस्वलही असंच मॉडेलिंग करतोय हे सांगितलं तर विश्वास बसेल का? काहीही असो हे फोटोज पाहून तुमचा यावर नक्की विश्वास बसेल.

- आपण नेहमीच अनेक सुंदर तरुण-तरुणींना मॉडेलिंग करताना पाहतो. मात्र, तुम्हाला जर कुणी एक अस्वलही असंच मॉडेलिंग करतोय हे सांगितलं तर विश्वास बसेल का? काहीही असो हे फोटोज पाहून तुमचा यावर नक्की विश्वास बसेल.
- सध्या सोशल मीडियावर या अस्वलाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
- या मॉडेल अस्वलाचं नाव स्टीफन असं आहे. स्टीफन रशियात राहणारा 700 पाऊंडचा ‘ब्राउन बिअर’ आहे.
- हे अस्वल माणसांसोबत खूपच फ्रेंडली आहे. ते माणूस करु शकणारी अनेक कामं सहजपणे करते. त्याचं वय 28 वर्षे आहे.
- रशियातील फोटोग्राफर Mila Zhdanova ची या अस्वलावर नजर गेली.
- स्टीफन अस्वलाच्या या कृती पाहून ती अवाक झाली. त्यानंतर तिने या अस्वलासोबत फोटो शूट करण्याचं प्लॅन केलं.
- अस्वलाचे केअरटेकर्स Svetlana आणि Yuriy Panteenko सांगतात, की स्टीफनची आई त्याला लहानपणीच सोडून गेली. 3 वर्षांचा असल्यापासून स्टीफन माणसांच्या देखरेखीखाली वाढला. त्यामुळे त्याला माणसांची अजिबात भीती वाटत नाही.
- स्टीफनच्या आवडीनिवडी आणि छंदही माणसांप्रमाणेच आहेत. तो मनोरंजन म्हणून टीव्ही देखील पाहतो. त्याला पाणी खेळायला देखील आवडते.
- या अस्वलाच्या अनोख्या कृती पाहून Mila ने एका रशियाच्या मॉडेलसोबत त्याचे आऊटडोर शूट केले.
- या फोटोशूटमध्ये अस्वलाचा मॉडेलसोबतचा सहज वावर अनेकांना अवाक करणारा आहे.
- यानंतर Mila ने स्टीफन अस्वलाचे इतर अनेक मॉडेल्ससोबत देखील फोटोशूट केले आहे.











