Statue of Unity | राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मोदींची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; सरदार पटेलांना अभिवादन!
मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. (Modi's visit to the Statue of Unity on the occasion of National Unity Day)

- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. (Photo – ANI)
- गुजरात दौऱ्यादरम्यान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. (Photo – ANI)
- स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देत मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहली. तसेच जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याला अभिवादन केले.(Photo – ANI)
- सरदार पटेलांच्या 145 व्या जयंतीनिमित्ताने आज या परिसरात एकता दौडचेही आयोजन करण्यात आले आहे. (Photo – ANI)
- राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त परेडचं आयोजन करण्यात आलं. या परेडमध्ये मोदींनी उपस्थिती दर्शवली.(Photo – ANI)
- या परेडमध्ये एनएसजी, एनडीआरएफ आणि गुजरात पोलीसही सहभागी झाले होते.(Photo – ANI)
- तसेच पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यानिमित्त देशातल्या पहिल्या सी-प्लेनचे उद्घाटन करणार आहेत. (Photo – ANI)







