देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत दोन प्रजासत्ताक परेड झाल्या.
यापैकी एक परेड होती दरवर्षी होणारी सरकारची राजपथवरील प्रजासत्ताक परेड, तर दुसरी होती मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची परेड.
शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी दिल्ली सीमेवर विविध ठिकाणी ट्रॅक्टर मार्च काढत ही आगळीवेगळी परेड केली.
या ट्रॅक्टर मार्चमध्ये काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याने संपूर्ण परेडच तशा पद्धतीने झाली की काय असं चित्र उभं राहिलं, मात्र या काही घटना वगळता शेतकऱ्यांची ही परेड आपल्या नियोजित मार्गांवर शांततेत पार पडली.
या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.
ट्रॅक्टर मार्चमधील प्रत्येक वाहनावर आणि व्यक्तीच्या हातात राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकावला जात होता.