PHOTOS : जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच, काय आहे वैशिष्ट्यं
जगातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच होत आहे. तिचं नाव एमजी सायबरस्टर 2-डोर इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असं आहे.

एमजीने दावा केलाय की या सायबरस्टर कारमध्ये गेमिंग कॉकपिट बसवण्यात आलंय. अशी ही जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे.
- जगातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच होत आहे. तिचं नाव एमजी सायबरस्टर 2-डोर इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असं आहे.
- एमजीने दावा केलाय की या सायबरस्टर कारमध्ये गेमिंग कॉकपिट बसवण्यात आलंय. अशी ही जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे.
- Mg Cyberster चं बाहेरील डिझाईन एमजीबी रोडस्टर स्पोर्ट्स कारवरुन प्रेरित आहे. तिच्या फ्रंट भागात स्लिम ग्रिल आणि ‘मॅजिक आय’ इंटरेक्टिव हेडलाईट्स आहेत.
- एमजी सायबरस्टर कारचं इंटेरियर ‘डिजिटल फायबर’ संकल्पनेपासून प्रेरित आहे. केबिनमध्ये कंफर्टेबल जीरो ग्रॅव्हिटी स्पोर्टी सीट्स, गेमपॅड स्टीयरिंग व्हील आणि एलईडी टचस्क्रीन देण्यात आलेय.
- एमजी साइबरस्टरने या कारमध्ये 5 जी कनेक्शन क्षमतेचा दावा केलाय. ही कार 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावते. ती 800 किमी प्रति तास वेगाने धावू शकते असाही दावा करण्यात आलाय.





