Year Ender 2023 : देशातील 6 नेते जे यावर्षी राहिले सर्वाधिक चर्चेत

Most popular Leaders of 2023 : नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. 2024 या नवीन वर्षात आपण नवे संकल्प केले असतील. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. देशातील जनता कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. पण 2023 या वर्षात देशातील कोणत्या नेते सर्वाधिक चर्चेत राहिले. याबद्दल देखील जाणून घेऊया.

| Updated on: Dec 20, 2023 | 7:15 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी  लोकप्रियतेच्या बाबतीत भारतातच नाही तर जगात पहिल्या स्थानावर आहे. या वर्षी G-20 शिखर परिषदेचे यजमान भारत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं यशस्वपणे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी ओळख यावेळी संपूर्ण जगाने पाहिली. या वर्षाच्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने तीन राज्यांत सत्ता मिळवली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदींनाच जाते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. नरेंद्र मोदी यांनी मॉर्निंग कन्सल्टच्या मान्यता रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.

1 / 6
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील या वर्षात चर्चेत राहिले. त्यांनी भारत जोडो यात्राच्या माध्यमातून देशात पदयात्रा केली. जानेवारी 2023 मध्ये त्यांच्या भारत जोडो यात्रेची सांगता झाली. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली होती. त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. गौतम अदानी यांचे नाव घेऊन त्यांनी पीएम मोदींवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांना संसदेचे सदस्यत्वही गमवावे लागले आणि नंतर त्यांना न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला. वर्षाच्या अखेरीस संपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्यांनी जवळपास प्रत्येक व्यासपीठावर गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदींची नावे घेतली. मात्र, निवडणुकीत त्यांना तेलंगणातच यश मिळाले तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांचा पराभव झाला.

2 / 6
2005 पासून बिहारमध्ये सत्तेवर असलेले नितीश कुमार या वर्षीही चर्चेत राहिले. कधी एनडीए तर कधी महाआघाडी... सतत बदलत्या निष्ठेमुळे त्यांची राजकीय प्रतिमा प्रभावित झाली आहे. मात्र, नितीश यांनी 2022 मध्येच एनडीएपासून फारकत घेत 2024 च्या निवडणुकीसाठी महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे राजकारण केंद्रित करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. मात्र बिहार विधानसभेत त्यांनी ज्या पद्धतीने लोकसंख्या नियंत्रणाबाबत विधान केले त्यावरून बराच गदारोळ झाला आणि नंतर त्यांना माफी मागावी लागली.

3 / 6
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावर्षी चांगलेच चर्चेत राहिले. त्यांनी सुरु केलेली बुलडोझर कारवाई यावर्षीही सुरूच होती. फेब्रुवारी 2023 मध्ये प्रयागराजमध्ये उमेश पाल हत्याकांडानंतर त्यांनी विधानसभेत दिलेले विधान अजूनही चर्चेत आहे. उमेश पाल खून प्रकरणात माफिया अतिक अहमदचे नाव समोर आले होते. विधानसभेत झालेल्या गदारोळात योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, या माफियाला नेस्तनाबूत करण्याचे काम त्यांचे सरकार करेल. हळुहळू योगी सरकारने अतिक आणि त्याच्या साथीदारांवर मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. उमेश पाल खून प्रकरणात सहभागी असलेला अतिकचा मुलगा पोलीस चकमकीत मारला गेला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस कोठडीत असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

4 / 6
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करून एनडीएमध्ये प्रवेश केला. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. एवढेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाही केला. अजित पवारांनी पहिल्यांदाच बंडखोरी केली असे नाही. 2019 मध्येही अजित पवारांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, मात्र पुरेसा आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती.

5 / 6
मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे शिवराज सिंह चौहान आता मुख्यमंत्रीपदावरून निवृत्त झाले आहेत. मामा या नावाने ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या सरकारने सुरू केलेली लाडली योजना खूप गाजली. विधानसभा निवडणुकीतील बंपर विजयानंतर पक्षाने राज्याचे नेतृत्व नव्या व्यक्तीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि शिवराज यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, पक्ष आपल्याला जी काही जबाबदारी देईल, ती पूर्ण निष्ठेने पार पाडू, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.