PHOTO : सिंधुदुर्ग किल्ल्याचे शुक्रवारी पर्यटकांना दुरूनच दर्शन, धार्मिक कार्यक्रमानिमित्त बंद
कोकणात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला शुक्रवारी बंद राहणार आहे. (Sindhudurg Fort close one day for tourism)

- कोकणात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला शुक्रवारी बंद राहणार आहे.
- येत्या 4 डिसेंबरला धार्मिक कार्यक्रमानिमित्त पर्यटकांसाठी हा किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे.
- दर तीन वर्षांनी असा धार्मिक कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ल्यावर आयोजित केला जातो. त्या पार्श्वभूमीवर हा किल्ला बंद ठेवला जाणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याची ओळख आहे.
- दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. मात्र शुक्रवारी पर्यटकांना किल्ल्याचे दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.





