
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : PTI)

अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोघे टीम इंडियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांच्या निशाण्यावर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. सध्या हा विक्रम हा माजी फिरकीपटू आर अश्विन याच्या नावावर आहे. अश्विनने 24 सामन्यांमध्ये 32 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या दोघांना टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी प्रत्येकी 2 विकेट्सची गरज आहे. बुमराह आणि अर्शदीप या दोघांच्या नावावर प्रत्येकी 30-30 विकेट्सची नोंद आहे. त्यामुळे सर्वात आधी कोण 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

अर्शदीप आणि जसप्रीत या दोघांव्यतिरिक्त ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील या शर्यतीत आहे. हार्दिकने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 29 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे हार्दिकला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप, बुमराह आणि हार्दिक या तिघांपैकी कोण जास्तीत जास्त विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी सुपर 8 मधील पहिला सामना फार महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit : PTI)