Asia Cup 2025 : टीम इंडियासोबत 23 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं, आशिया कप स्पर्धेआधी नक्की काय झालं?

Indian Cricket Team : बीसीसीआयची जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ख्याती आहे. तर टीम इंडिया सर्वात यशस्वी क्रिकेट संघ आहे. मात्र आशिया कप स्पर्धेनिमित्ताने टीम इंडियावर 23 वर्षांनी पुन्हा एकदा नकोशी वेळ ओढावली आहे. जाणून घ्या आजपासून 23 वर्षांआधी टीम इंडियासोबत काय झालं होतं?

| Updated on: Sep 08, 2025 | 8:56 PM
1 / 5
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम हा टीम इंडियावर झाला. भारतीय सरकारने ऑनलाईन गेमिंग एपवर बंदी घातली. त्यामुळे अनेक ऑनलाईन गेमिंग एप बंद झाले. ड्रीम 11 आणि बीसीसीआय यांच्यात करार होता. मात्र गेमिंग एप बंद झाल्याने बीसीसीआय आणि ड्रीम 11 ईलेव्हन यांच्यातील करार मोडीत निघाला.  (Photo Credit : PTI)

2 / 5
त्यामुळे आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा नवा स्पॉन्सर कोण असणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. बीसीसीआय अल्पावधीसाठी स्पॉन्सरच्या शोधात होती. मात्र कालावधी काही महिन्यांचा असल्याच्या अटीमुळे  स्पॉन्सर म्हणून कुणीही स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या जर्सीवर कुणाचं नाव असणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना होता. चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. भारतीय संघाच्या नवी जर्सीची पहिली झलक समोर आली आहे. (Photo Credit : Instagram)

3 / 5
मुंबई आणि टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे याची आशिया कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शिवमने सोशल मीडियावर नव्या जर्सीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. शिवमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  (Photo Credit : Instagram)

4 / 5
मात्र भारताच्या नव्या जर्सीवर स्पॉन्सरचं नाव नाही इतकाच फरक आहे. या नव्या जर्सीवर दर्शनी भागावर 'INDIA' असं ठळक अक्षरात लिहीलेलं आहे. तर जर्सीच्या एका कोपऱ्यात आशिया कप 2025 स्पर्धेचा लोगो आहे. तसेच एका बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे.(Photo Credit : Instagram)

5 / 5
त्यामुळे टीम इंडियाला आशिया कप स्पर्धेनिमित्ताने जवळपास 23 वर्षांनंतर स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे. टीम इंडियाला याआधी 2002 साली एका वादामुळे स्पॉन्सरशिवाय खेळावं लागलं होतं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2002 या स्पर्धेत भारताला स्पॉन्सशिवाय खेळावं लागलं होतं. (Photo Credit : Getty Images)