PHOTO : कॅप्टन कूलचा ‘कूल हेअरकट’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, फॅन्सकडून लाईक्सचा पाऊस

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम खानने महेंद्र सिंह धोनीचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये धोनी नव्या हेअरकटमध्ये दिसून येत आहे.

1/5
जागातिक क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमधील एक खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी (Mahendrasingh dhoni). भारताचा माजी कर्णधार धोनीचे चाहते लाखोंच्या घरात असून धोनीने कोणतीही गोष्ट केली तरी चाहते त्याला डोक्यावर घेतात. आता त्याने नवी हेअरस्टाईल केल्यानंतरही चाहत्यांनी त्याच्या नव्या फोटोंना डोक्यावर घेतलं आहे.

2/5
धोनीची ही नवी हेअरस्टाईल प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम खानने (Alim Khan) केली आहे. केसांसोबतच धोनीच्या दाढीलाही नवा लूक देण्यात आला आहे.

3/5
धोनीच्या या नव्या लूकमधील फोटो आलिमनेच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंवर धोनीचे चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

4/5
धोनीच्या या हेअरस्टाईलला त्याने फॉक्स हॉक असे नाव दिले असून हा लूक धोनीला चांगलाच शोभून दिसत आहे.

5/5
एमएस धोनीने या महिन्याच्या 7 तारखेला (7 जुलै) 40 वा वाढदिवस साजरा केला. अनेक नामांकित व्यक्तींनी धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI