T20 WC 2026: अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची झिम्बाब्वेविरूद्ध विक्रमी ओपनिंग, कसं काय ते जाणून घ्या

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्धचा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकलो तरच उपांत्य फेरीच्या आशा कायम राहतील. असं असताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय ओपनर्नंनी अशी फलंदाजी केली.

| Updated on: Feb 26, 2026 | 8:53 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकला तरच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याला महत्त्व राहील. त्यामुळे भारताच्या सलामीच्या जोडीकडे लक्ष लागून होतं. कारण पहिल्या पाच सामन्यात निराशाजनक कामगिरी रहिली होती. पण झिम्बाब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने चांगली सुरूवात करून दिली. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
झिम्बाब्वेविरुद्ध भारताच्या सलामीवीरांनी 23 चेंडूत 48 धावा केल्या. यात संजू सॅमसनने 15 चेंडूत 24 धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने 8 चेंडूत 17 धावा केल्या. या स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी पहिल्यांदा इतकी मोठी भागीदारी केली आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने 48 धावांची खेळी केली. या जोडीने 27वी धाव घेताच या स्पर्धेतील आपलाच विक्रम मोडला. यावरून भारतीय सलामीवीर कसे फेल गेले याचा अंदाज येत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात सलामीवीर भारी पडले. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारतीय सलामीवीरांनी मागच्या पाच सामन्यात एकूण 34 धावा केल्या. यात अभिषेक शर्मा तीन वेळा शून्यावर बाद झाला. तर एकदा इशान किशनला खातं खोलता आलं नव्हतं.  त्यामुळे वारंवर पदरी निराशा पडत होती. पण यावेळी तसं काही झालं नाही. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
संजू सॅमसनने 15 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 24 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 160 चा होता. तर अभिषेक शर्माने 30 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 55 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 183.33 आहे. (Photo- BCCI Twitter)

Follow Us