
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम हा माजी फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 72 सामन्यांमध्ये 74 षटकार लगावरले आहेत. रोहितने या दरम्यान 68 डावांमध्ये 26.20 च्या सरासरीने 1 हजार 520 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

रोहितनंतर या यादीत भारताचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. सूर्याने 38 सामन्यांत 54 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

भारताचा माजी फलंदाज विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटला चेस मास्टर म्हटलं जातं. विराटने भारतासाठी विजयी धावांचा पाठलाग करताना अनेक विक्रम केले आहेत. तसेच विराटने टी 20i क्रिकेटमध्ये 53 सामन्यांमध्ये 53 षटकार लगावले आहेत.

केएल राहुल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. केएलने 32 सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना 32 सामन्यांमध्ये 40 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी फलंदाज युवराज सिंह या यादीत पाचव्या स्थानी आहे.युवराजने 28 सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना 31 षटकार खेचले आहेत. (Photo Credit : PTI)