Photo | धोनीच्या रेकॉर्ड मॅचमध्ये ‘प्रियम’ वादळ घोंगावलं, चेन्नईला आस्मान दाखवलं
सलग दोन पराभवाचा सामना केलेल्या सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. (SunRisers Hyderabad beat Chennai Super Kings by 7 runs)

- सलग दोन पराभवाचा सामना केलेल्या सनरायजर्स हैदराबादने प्रियम गर्ग या अवघ्या १९ वर्षीय खेळाडूच्या वादळी खेळीद्वारे आयपीएलमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे.
- आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला सनरायजर्स हैदराबादने पराभवाची धूळ चारली.
- हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते.
- मात्र चेन्नईने 20 षटकात 5 विकेट गमावून 157 धावा केल्या. त्यामुळे अवघ्या 7 धावांनी हैदराबादचा विजय झाला.
- चेन्नईच्या विजयासाठी रवींद्र जडेजा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी शर्थीचे प्रयत्न केले.
- चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद 47 धावा केल्या.
- धोनीने चेन्नईच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र धोनीला चेन्नईला विजय मिळवून देण्यास अपयश आले.
- हैदराबादने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हैदराबादची सुरुवात खराब झाली.
- अकराव्या ओव्हरमध्ये लागोपाठ दोन विकेट गमावल्यामुळे हैदराबादची परिस्थिती 69-4 अशी होती.
- हैदराबाद अडचणीत असताना प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा जोडीने डाव सावरला.
- प्रियम गर्ग या युवा खेळाडूने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक 77 धावांची भागीदारी केली.











