Tulja Bhavani Devi | दुर्गाअष्टमीनिमित्त तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरु असून आज दुर्गाष्टमी निमित्त तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. महिषासुर दैत्याने सर्व देवतांना हाकलून दिले आणि स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे.

Tulja Bhavani Mata Mandir
- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरु असून आज दुर्गाष्टमी निमित्त तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.
- महिषासुर दैत्याने सर्व देवतांना हाकलून दिले आणि स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे.
- तिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला आणि सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला शिवकालीन दागिने असलेला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.
- आई भवानीला महिषासुर दैत्याचा वध करताना दाखविण्यात आले आहे.
- यावेळी मंदिराचा गाभारा आणि परिसर आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आला होता.
- दुर्गाष्टमी निमित्त आज अनेक भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.






