Vastu Tips : घरच्या देव्हाऱ्यात देवाची मूर्ती ठेवताना ही चूक टाळा
आपल्या घरात देव्हारा किंवा मंदिर हे कुठे आणि कोणत्या दिशेने बांधावं, हे वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. तसेच देवाची मूर्ती ठेवताना कोणत्या दिशेला असंवा हेही नमूद करण्यात आलं आहे. घ्या जाणून...

- घरात कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबद्दल वास्तुशास्त्रात संपूर्ण माहिती दिलीले असते. आज आपण घरात देव्हाऱ्यात देवांचे, मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला ठेवावे ते जाणून घेऊया.
- घरातील मंदिरात ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, सूर्य आणि कार्तिकेय यांनी नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करावे.
- याशिवाय गणेश, कुबेर आणि दुर्गा मातेच्या मूर्ती किंवा फोटो नेहमी दक्षिणेकडे तोंड करून ठेवावेत.
- घरच्या देव्हाऱ्यात देवांचे फोटो एकमेकांच्या विरुद्ध ठेवू नयेत. तसेच, देवांची मूर्ती किंवा फोटो कधीही उत्तर आणि दक्षिण भिंतीजवळ ठेवू नयेत.
- तसेच, महाभारताचे चित्र, प्राणी-पक्ष्यांच्या प्रतिमा आणि वास्तुपुरुषाची कोणतीही प्रतिमा प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्यात ठेवू नये.
- (डिस्क्लेमर : वरील माहिती वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीच्या आधारे घेतली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)






