Marathi News » Photo gallery » What's happened if home loan personal loan auto loan borrower died emi loan dues family responsibility
Home Loan घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांना हप्ते फेडावे लागतात का?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar
Updated on: Jun 21, 2021 | 11:32 AM
Loan EMI | सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्याच्या आर्थिक गोष्टींचा बोझा कुटुंबावर पडतो का, असे प्रश्न अनेकांना पडतात.
एसबीआयची कोट्यवधी ग्राहकांना भेट, कर्ज केले स्वस्त
सध्या कोरोना संकटात मोठ्याप्रमाणावर लोकांचा मृत्यू होत आहे. दिवसाला साधारण हजारभर लोकांचा बळी जात आहे. अगदी धडधाकट आणि तरुण व्यक्तींचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्याच्या आर्थिक गोष्टींचा बोझा कुटुंबावर पडतो का, असे प्रश्न अनेकांना पडतात.
पर्सनल लोन
तुमचा रिपेमेंट रेकॉर्ड आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला केवळ एक फॉर्म भरून केवायसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. त्यानंतर तुमचे लोन ट्रान्सफर होईल.
घर खरेदी हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा भाग असला तरी त्यानंतर फेडावे लागणारे गृहकर्जाचे हप्ते ही बहुतांश लोकांसाठी एकप्रकारची टांगती तलवार असते. तुम्ही गृहकर्जावर पाच लाख रुपयांपर्यंत करमाफी मिळवू शकता. मात्र, गृहकर्जाचे हप्ते वेळेवर फेडले नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
एसबीआयची कोट्यवधी ग्राहकांना भेट, कर्ज केले स्वस्त
पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डावरील लोन हे असुरक्षित श्रेणीत येते. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँका याप्रकारची कर्जे माफ करुन त्याची बुडीत खात्यात नोंद करतात. मृताच्या कुटुंबीयांना हे कर्ज फेडणे बंधनकारक नसते.
वाहन कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना लोन फेडण्यासाठी विचारण केली जाते. ते असमर्थ असतील तर वाहन जप्त करुन कर्जाची वसुली केली जाते.
आयसीआयसीआय बँक देतेय 1 कोटीपर्यंतचे तत्काळ शैक्षणिक कर्ज