जळगाव : काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते. त्यामुळे अश्या चिंधी चोरांकडे लक्ष देऊ नका. मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसंवाद (shiv samvad) यात्रा आज जळगावात आली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या निमित्ताने जळगावमध्ये त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर कुणी तरी फाडल्याने शिवसैनिक (shiv sena) संतप्त झाले होते. या घटनेचा आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख करत पोस्टर फाडणाऱ्यांना चिंधी चोर म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर घणाघाती हल्ला चढवताना बंडखोरांना पुन्हा एकदा गद्दार संबोधत डिवचले.