ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीविषयी कोर्टात याचिका; आदित्य ठाकरे यांना विचारताच म्हणाले…

आम्ही आधी जे केलं. तेच आता करण्यात येत आहे. अनेकांना आता वरळी आवडायला लागली आहे. जांबोरी मैदानाचं आम्ही सुशोभिकरण केलं. लाखो रुपये खर्च केले.

ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीविषयी कोर्टात याचिका; आदित्य ठाकरे यांना विचारताच म्हणाले...
ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीविषयी कोर्टात याचिका; आदित्य ठाकरे यांनी सांगितली खरी संपत्तीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 4:30 PM

मुंबई: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात ठाकरे कुटुंबीयांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. दसरा मेळाव्यात जे शिवसैनिक (shivsainik) आले होते ती आमची संपत्ती आहे, असं सांगतानाच कोर्टावर जास्त काही बोलणार नाही, असं आदित्य ठाकरे (aaditya thackeray) म्हणाले.

आदित्य ठाकरे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. आज सकाळी मला त्याबाबत कळलं. 11.30च्या आसपास त्यांचा पोलीस बंदोबस्त काढला गेला. त्यानंतर हल्ला झाला. त्यामुळे यामागे कोणता राजकीय हेतू आहे. याची चौकशी झाली पाहिजे. यंत्रणेचा गैरफायदा घेणं चुकीचं आहे. जो बोलतो त्याला आत टाका, चौकशी करा हेच सुरू आहे. राज्याचं राजकारण इतक्या खालच्या पातळीला कधी गेलं नव्हतं, असा उद्वेग आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

दिवाळीत राज्यातील जनतेला 100 रुपयात शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या सरकारकडून काही अपेक्षा नाही. हे सरकार घोषणा सरकार बनलं आहे. स्वत:चे फोटो बसेसवर एसटीवर लावण्यात व्यस्त होते, अशी टीका त्यांनी केली.

परतीच्या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या परिस्थितीवर राजकारण करू नये असं आता सांगितलं जातं. मुंबई तुंबल्यावर शिवसेना चुकीची असते. इथे कुणाला जबाबदार धरणार. पुण्यात नेमकं असं का झालं? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपने वरळीत दीपोत्सवाचे आयोजन केलं आहे. आम्ही आधी जे केलं. तेच आता करण्यात येत आहे. अनेकांना आता वरळी आवडायला लागली आहे. जांबोरी मैदानाचं आम्ही सुशोभिकरण केलं. लाखो रुपये खर्च केले. पण दहीहंडीला जशी वाट लावली, तशी आता मैदानाची वाट लावू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मी खरगे यांचं अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.