दिल्ली निवडणुकीत आप आणि भाजपमधील चुरस तीव्र, भाजपकडून 57 उमेदवारांची घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. मागील विधानसभेत काँग्रेस आणि भाजपचा धुव्वा उडवत सत्तेत आलेल्या आपने पहिल्याच यादीत सर्वच्या सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली  (AAP and BJP Candidate List for Delhi Assembly Election).

दिल्ली निवडणुकीत आप आणि भाजपमधील चुरस तीव्र, भाजपकडून 57 उमेदवारांची घोषणा
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 10:22 AM

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. मागील विधानसभेत काँग्रेस आणि भाजपचा धुव्वा उडवत सत्तेत आलेल्या आपने पहिल्याच यादीत सर्वच्या सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली  (AAP and BJP Candidate List for Delhi Assembly Election). दुसरीकडे भाजपने शुक्रवारी (17 जानेवारी) पहिली यादी जाहीर 57 उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपने अद्यापही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. हाच मुद्दा पकडत भाजपची पहिली यादी जाहीर होताच आपने भाजपला केजरीवाल यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न विचारला आहे (AAP and BJP Candidate List for Delhi Assembly Election).

भाजपने दिल्लीतील 70 पैकी 57 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. यात 11 उमेदवार अनुसूचित जातीचे (SC) असून 4 महिलांचा समावेश आहे. या यादीत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या मतदारसंघातून आपकडून स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक मैदानात आहेत. यावर आपने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपने केजरीवाल यांच्या विरोधात आपल्या उमेदवाराची घोषणा केली का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच दिल्ली भाजपकडे याचं उत्तर आहे का? असंही म्हटलं. आपने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तीन हिंदी गाण्यांचा काही भाग घेत नाही, नाही असं म्हटलं आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व 70 उमेदवारांच्या नावाची घोषणा पहिल्याच यादीत केली. यात आपने 46 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली, तर 15 विद्यमान आमदारांचं तिकिट कापण्यात आलं आहे. 9 जागांवर आपने नव्या उमेदवारांनाही संधी दिली आहे. आपने यावेळी 8 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली.

दुसरीकडे भाजपने मागील उमेदवारांपैकी 26 नेत्यांची तिकिटं कापली. यात भाजप दिल्लीचे माजी उपाध्यक्ष आणि रिठाला मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या कुलवंत राणा यांचाही समावेश आहे. भाजपने अजून नवी दिल्ली, महरौली, संगम विहारसह 13 जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भाजपने 2015 मध्ये निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांना यावेळी तिकिट दिलेलं नाही.

संबंधित बातम्या :

केजरीवाल यांच्याविरोधात 9 रुपये रोकड असणारा ‘आम आदमी’ निवडणूक रिंगणात

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.