AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी’, अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलंय. मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा, अशा शब्दात सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

'राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी', अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
आदित्य ठाकरे, अब्दुल सत्तारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 11:59 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तसंच शिवसेना खासदार संजय राऊत जोरदार हल्ला चढवत आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संघटन मजबूत करण्यसाठी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत औरंगाबादेतून बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान दिलं होतं. आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलंय. मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा, अशा शब्दात सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

सत्तार म्हणाले की, मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा. माझी मातोश्रीवर जायची इच्छा नाही. आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघात यावं. या आधी आला नव्हता पण आता या, असा टोलाही सत्तार यांनी लगावलाय.

आदित्य ठाकरेंची शिंदे गटातील आमदांवर टीका

सगळं काही ठीक सुरु असताना गद्दारी करण्याची गरज काय पडली? नेमकं असं काय घडलं? हे बेकायदेशीर सरकार कोसळणार आहे. पण हे सगळं होत असताना विधानसभेत माझ्यासोबत 15 आमदार होते. आम्ही सगळे सोबत बसलेलो. तेव्हा तात्पुरते समोर ते बसले होते. जेव्हा ते समोर बसलेले आम्ही स्वाभिमानाने त्यांच्याकडे पाहत होतो आणि समोर बसलेले गद्दार आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. त्यांचे खरे मुखवटे आता फाटले आहेत. आतापर्यंत सांगत होते की ठाकरे आणि शिवसेनेबाबत आदर आहे, पण काल आणि आज बघा त्यांची वक्तव्य समोर येत आहेत. आता ते धमक्या द्यायला लागले आहेत. त्यांनी आपलं इमान का विकलं? आम्ही नक्की चुकीचं काय केलं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना केलाय.

आदित्य ठाकरेंनंतर मुख्यमंत्रीही राज्याच्या दौरा करणार

संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी नुकताच नाशिक, औरंगाबाद आणि नगरचा दौरा केला. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेही नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. 30 आणि 31 जुलैला शिंदे या दोन शहरांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलीय.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.