AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत बिचुकलेंना निवडणूक आयोगाची नोटीस, उमेदवारीवर टांगती तलवार

उमेदवारांना निश्चित केलेल्या दैनिक खर्च नोंदवह्या तपासणीसाठी सादर केल्या नसल्याने अभिजीत बिचुकले यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

अभिजीत बिचुकलेंना निवडणूक आयोगाची नोटीस, उमेदवारीवर टांगती तलवार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 11, 2019 | 3:26 PM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले ‘बिग बॉस’ सेलिब्रिटी अभिजीत बिचुकले यांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. बिचुकलेंसह वरळी मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस (Abhijit Bichukale Election Commission Notice) पाठवली आहे. त्यामुळे बिचुकलेंच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.

लोकप्रतिनिधित्व अधिनियमा अंतर्गत अभिजीत बिचुकले, विश्राम पाडम आणि महेश खांडेकर या तिघा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी ही माहिती दिली. वरळी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निश्चित केलेल्या दैनिक खर्च नोंदवह्या तपासणीसाठी सादर केल्या नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

बिचुकलेंसह तिघा उमेदवारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार नोटिसा (Abhijit Bichukale Election Commission Notice) बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिशीला उमेदवारांनी वेळेत उत्तर दिलं नाही, तर त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार आयोगाला असतो.

बिचुकले, पाडम आणि खांडेकर आपल्याला आलेल्या नोटिशीला काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. बिचकुले यांनी आपण आदित्य ठाकरेंचा पराभव करु असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र आता नोटीस आल्यानंतर त्यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वरळी मतदारसंघाकडे लागलं आहे. ‘बिग बॉस’मुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बिचुकलेही (Abhijit Bichukale Election Commission Notice) या मतदारसंघातून नशीब आजमावत असल्याने अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.

आदित्य यांच्या विरोधात वरळी मतदारसंघामधून मनसेने उमेदवार दिलेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अॅड. सुरेश माने यांना तिकीट दिलं आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले ? 

  • अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.
  • अभिजीत बिचुकले हा बिग बॉस मराठी सिझन 2 मधील स्पर्धक
  • अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.
  • साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.
  • बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे.
  • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.

संबंधित बातम्या 

शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले   

पवारसाहेब उभे राहिले तरीही 100 टक्के लढणार : अभिजीत बिचुकले 

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट