शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन, मी स्वत: पंतप्रधान होईन," असे बिग बॉस फेम आणि साताऱ्यातील कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale On Election) म्हणाले.

शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले

सातारा : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन, मी स्वत: पंतप्रधान होईन,” असे बिग बॉस फेम आणि साताऱ्यातील कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale On Election) म्हणाले. “साताऱ्यातील विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक या दोन्हीसाठी मी अर्ज करणार आहेत. या जिल्ह्याने शरद पवारांना मोठं केलं. त्यामुळे सातारकर मलाही मोठं करतील”, असा विश्वास बिचुकलेंनी यावेळी बोलताना व्यक्त (Abhijit Bichukale On Election) केला.

बिग बॉस 2 मधील स्पर्धक पराग कान्हेरे याने नुकतंच अभिजित बिचुकले यांची भेट घेतली. त्यावेळी परागने बिचुकलेंना लोकसभा आणि विधानसभेसाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या. “येत्या निवडणुकीत अभिजितला भरघोस यश मिळावे म्हणून मी कोल्हापूरवरुन येताना कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या पायाजवळील कुंकू आणलं आहे. साताऱ्यातील जनतेने अभिजितवरील प्रेम कमी होऊ देऊ नका”, अशी भावनिक सादही परागने घातली.

येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार असल्याचे अभिजित बिचुकले यांनी सांगितले होते. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “288 जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मात्र दोन्ही राजे जे टोलनाका, दारुचे दुकान, कार्यकर्ते या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत असतात, त्यामुळे यंदा सातारकरांनी नीट विचार करावा. या दोन्ही राजांना राजे राहू द्या आणि तुमच्या अभिजित बिचुकलेला विधानसभा आणि लोकसभेसाठी पाठवा,” अशी टीकाही बिचुकले यांनी (Abhijit Bichukale On Election) यावेळी केली.

“बिग बॉस मराठी 2 च्या सिझनमध्ये सर्व कलाकारांचे मुखवटे दिसले. पण माझा मुखवटा दिसला नाही. सातारकरांसह महाराष्ट्राने मला भरभरुन प्रेम दिले. त्याचा मी आभारी आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही राजांना जनतेची काहीही पडलेली नाही. त्यांनी कसलीही गरज नाही. शिवेंद्र राजेंनी सुरुचीचे कारखाने सांभाळावे. तर दुसऱ्या राजांचा पराभव झाला, तरी त्यांचे मंत्री पद निश्चित आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीत सातारकरांनी तिसऱ्या भावाला म्हणजेच अभिजित बिचुकलेला संसदेत निवडून पाठवावे असे ते म्हणाले.

“याआधीही 1995 मध्ये उदयनराजेंचा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे आता बिग बॉस अभिजित बिचुकलेपुढे त्यांचा पराभव झाला तर त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यांचा पराभव झाला तरी एवढं वाईट वाटायचं कारण नाही. ते शेवटी माझे भाऊ आहेत,” असेही उदयनराजेंबाबत (Abhijit Bichukale On Election) बिचुकले म्हणाले.

“तुम्ही तिकडेच थांबा. शेतकऱ्यांचे भले करा. यापुढे साताऱ्याला कसं वळणं द्यायचे ते मी बघतो. साताऱ्यातील जनतेनेच दोन्ही राजांना घडवलं. तर तुम्हीच आम्हालाही घडवा, असा सल्लाही त्यांनी दोन्ही राजांना दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *