AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी मराठा, महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचं ते करा, कंगनाचा इशारा

अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकेची झोड उठत आहे.

मी मराठा, महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचं ते करा, कंगनाचा इशारा
| Updated on: Sep 04, 2020 | 8:18 PM
Share

मुंबई : “महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. मराठीच्या गौरवाला ज्यांनी प्रतिष्ठित केलं, महाराष्ट्र त्यांचाच आहे. मी मराठा आहे आणि हे मी निक्षूणपणे सांगते. जे करायचंय ते करा”, असा इशारा अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut) ट्विटरवर दिला आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तर कंगनाचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन केलं. त्यानंतर कंगनाने ट्विटरवर शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला.

“यांची लायकी नाही. गेल्या 100 वर्षात मराठ्यांचा इतिहास सांगणारा एकही चित्रपट तयार केला नाही. मी इस्लाम डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या ठेकेदारांना विचारा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?”, असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

“हिंदी चित्रपटसृष्टीत मी सर्वातआधी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट तयार केला आहे, हे चापुलसी करणारे, महाराष्ट्राप्रती प्रेम असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. मी चित्रपट तयार केला त्यावेळीदेखील या लोकांनी मला विरोध केला होता”, असं कंगना म्हणाली.

कंगना यावरच  थांबली नाही. तिने यापुढेही ट्विट सुरुच ठेवले. “एका महान पित्याचा पुत्र होणं, हे एकमेव कतृत्व होऊ शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? तुम्ही माझ्यापेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम करता हे तुम्ही कसे ठरवले? आता मला तिथे येण्याचा अधिकारही नाही?”, असे सवाल कंगनाने उपस्थित केले.

संबंधित बातम्या :

कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत होईल, असं वाटत असेल तर… : अमेय खोपकर

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं

“बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.