AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडाला;’सॅफ्रन’ राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'सॅफ्रन' प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडाला;'सॅफ्रन' राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 30, 2022 | 3:14 PM
Share

मुंबई :  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर (State Govt) जोरदार निशाणा साधला आहे. ‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे. त्यामध्ये उद्योग (Industry) आणि कृषी क्षेत्राचा समावेश असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यानं मुंबईच्या लालबाग परिसरात ठाकरे गटाकडून बॅनर लावत शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. या बॅनरवर आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांची नावं लिहिण्यात आली आहेत. तसंच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. ‘दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे, उद्योग आणि कृषी… गुंतवणूकदारांचा राजकीय स्थौर्यावरील विश्वास उडाला आहे. तर हवामान संकटावेळी शेतकऱ्यांचा सरकारच्या पाठिंब्यावरचा विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा + प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास = महाराष्ट्राचे नुकसान’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

शिंदे, फडणवीस सरकारविरोधात बॅनरबाजी

दरम्यान दुसरीकडे आज ठाकरे गटाकडून मुंबईच्या लालबाग परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या बॅनवर आतापर्यंत राज्याच्याबाहेर गेलेल्या प्रकल्पाांची यादी देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही विचारण्यात आला आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?