AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya thackeray : आमच्याशी डोळे भिडवायची हिंमत नाही, मतदारसंघात असं करू नका, आदित्य ठाकरेंचा बंडखोर गटाला सल्ला

Aditya Thackeray : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खुद्द शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर आणि भाजपला टोला लगावला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर गटाला सल्ला दिला. आदित्य ठाकरेंचा तो सल्ला चांगलाच चर्चेत आलाय.

Aditya thackeray : आमच्याशी डोळे भिडवायची हिंमत नाही, मतदारसंघात असं करू नका, आदित्य ठाकरेंचा बंडखोर गटाला सल्ला
आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सल्लाImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 03, 2022 | 2:59 PM
Share

मुंबई : आज विधानसभेत पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि शिवसेनेचे आमदार आमने सामने आले. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यानं आज विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि सर्वपक्षीय आमदारांनी भाषणं केली. यावेळी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी भाजपवर संधी मिळेत त्या ठिकाणी टीका करणं सोडलं नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खुद्द शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर आणि भाजपला टोला लगावला. तर  भाजपकडूनही पलटवार करण्यात आला. या सगळ्यात सभागृहाच्या बाहेर आल्यावर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर गटाला सल्ला दिला. ‘आमच्याशी डोळे भिडवायची हिंमत नाही, मतदारसंघात असं करू नका,’ असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

आज विधानसभेच्या अधिवेशात इतर महत्वाच्या गोष्टींनी लक्ष वेधलं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक विधान केलं आणि त्याचीही चर्चा झाली. विशेष म्हणजे सभागृहात हे विधान केल्यानं काँग्रेसचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा तर नाही ना, असंही प्रश्न निर्माण झाला.

काँग्रेसनं शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून मान्य केलं?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक विधान केलं. थोरातांचं हे विधान शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्षात काँग्रेसची ठिणगी तर नाही ना, असंही बोललं जातंय.  बाळासाहेब  थोरात यांनी भाषण करताना आधी विधानसभेच्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना त्यांनी एक विधान केलं.  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं विधानसभेत हे विधान केल्यानं ते प्रचंड चर्चेत आलंय. थोरात म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेत,’ असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलं. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेस हा पक्ष एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री मानतो का? असे अनेक प्रश्न थोरातांच्या विधानावरुन सध्या चर्चेत आले आहेत.

अबू आझमींचा सवाल

उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला. नामांतराच्या मुद्यावरून अबू आझमी यांनी आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. औरंगाबादचं नाव बदलून तुम्हाला काय संदेश द्यायचाय असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिले याचे वाईट वाटत असल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. जुन्या शहरांचे नाव बदलून काय फरक पडणार आहे. जर तुम्ही एखादे नवे शहर वसवले असते तर गोष्ट वेगळी होती असे आझमी यांनी म्हटले आहे. दरम्यान अबू आझमी यांचे भाषण सुरू असतानाच अभिनंदन ठरावावर बोलावं असे आवाहन त्यांना विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार