AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narsapur Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट

Narsapur Case : अंतिम सुनावणीवेळी न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची, अशी विचारणा कोर्टाने केली होती.

Narsapur Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट
Narsapur Case
| Updated on: Jun 29, 2026 | 11:47 AM
Share

नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे. मे महिन्यात ही घटना घडली होती. संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. आरोपी भीमराव कांबळेने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. पुणे शिवाजी नगर येथील विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मागच्या आठवड्यात दोषी ठरवलं होतं.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला बोलवून तिच्यावर अत्याचार केला होता.प्राथमिक तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झालं होतं. पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूरमध्ये ही घटना घडली होती.

नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाईल. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून कोर्टाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी” अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. “कोर्टात आज युक्तीवाद होणार नाही. आरोपीला हजर करुन शिक्षेची सुनावणी होईल अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. आरोपीचा मागचा इतिहास बघता तो सुधारु शकत नाही. कोर्टाने हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून आरोपी मृत्यूदंड द्यावा” अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

तुला कोणती शिक्षा द्यायची?

आरोपी भीमराव कांबळेने चिमुकलीचा निर्घृण खून केल्यानंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवला होता. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आलं होतं. नसरापूरच्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अंतिम सुनावणीवेळी न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची, अशी विचारणा कोर्टाने केली होती.

फास्ट ट्रॅकवर सुनावणी

न्यायालयीन इतिहासात या खटल्याची जलदगतीने सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे हा 65 वर्षांचा आहे. या घटनेनंतर संतापून नागरिक स्वत: रस्त्यावर उतरले होते. जनतेचा संपात लक्षात घेत सरकारने फास्ट ट्रॅकवर या खटल्याची सुनावणी केली. पोलिसांनी याप्रकरणी बाराशे पानांची चार्जशीट तयार केली होती. आरोपीला मृत्युदंड किंवा जन्मठेप अशी शिक्षा दिली जाऊ शकते.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला