AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir: शिंदे गटात जाताच सचिन अहिर ठाकरेंवर बरसले, पहिल्या प्रतिक्रियेत थेट हल्लाबोल; म्हणाले सोबत होतो तेव्हा…

Sachin Ahir: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता दुसरा धक्का बसला आहे. सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्या नंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर यांनी देखील ठाकरेंची शिवसेना सोडली आहे. त्यांनी एकना शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Sachin Ahir: शिंदे गटात जाताच सचिन अहिर ठाकरेंवर बरसले, पहिल्या प्रतिक्रियेत थेट हल्लाबोल; म्हणाले सोबत होतो तेव्हा...
Sachin Ahir Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 30, 2026 | 3:19 PM
Share

विधान परिषदचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण एक आठवडाभरापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ आता लगेच आमदार सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश झाला. आता सचिन अहिर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत ते ठाकरेंवर अक्षरश: बरसले आहेत.

काय म्हणाले सचिन अहिर?

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो. कोळश्यातून हिऱ्याची चमक दिसते. आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातून विश्व घडतं. शिंदेंनी मला उपसभापती या पदावर मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केलं. सरकारमध्ये राहून काम केलं पाहिजे. पण विधिमंडळातूनही काम करण्याचं काम मी त्यांच्या नेतृत्वात करणार आहे. उपसभापतीपदासाठी अनेक लोकांची नावे घेता येतील. रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून मोठं काम केलं. तीच गरीमा मी ठेवणार आहे. जिथे पक्ष बळकट नाही. तिथे काम करणार आहे. ग्रामीण भागात जाऊन काम करणार आहे.

“महापालिकेत माझं काय योगदान आहे हे तिथल्या लोकांना माहीत”

पुढे ते म्हणाले, राजकीय प्रश्नावर मी वेगळ्या व्यासपिठावर उत्तर देईन. ते टीका करतील. आम्ही सोबत आहोत तर चांगले आहोत. सोबत नाही तर नालायक आहोत असं बोललं जातील. ही भूमिका दुर्देवी आहे. मी वेगळ्या व्यासपीठावरून त्यावर बोलेन. प्रतिक्रिया येऊ द्या. कोण म्हणतं मी स्वार्थासाठी आलो. वगैरे टीका होत आहे. त्या येऊ द्या. वेळेवर योग्य रितीने योग्य उत्तर देईन. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली. ती पार पाडण्याचं काम केलं आहे. शिंदेही साक्षीला आहे. पक्ष म्हणून जी जबाबदारी असते तिथे काम करावं लागतं. विधानसभा आणि महापालिकेत माझं काय योगदान आहे हे तिथल्या लोकांना माहीत आहे. पुण्यातील २१ विभागातील लोकांनाही योगदान माहीत आहे. काही लोकांना वाटतं आम्हीच आहोत बाकी कोण नाही.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर