AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात मित्र पक्षांचं स्थान नसल्यासारखं झालं आहे.

ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त
| Updated on: Oct 10, 2020 | 12:59 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मित्र पक्षांचं स्थान नसल्यासारखंच आहे. मोदींचं मंत्रिमंडळ आता केवळ नावापुरतं एनडीएचं (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) मंत्रिमंडळ आहे. पासवानांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एकच मंत्री हे गैरभाजपचे आहेत. उर्वरीत सर्व मंत्री हे भाजपचे आहेत. (After Ram Vilas Paswan demise only one non bjp face in nda cabinet now)

पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करताना पूर्वीपेक्षा लहान मंत्रीमंडळ बनवलं होतं. गेल्या दिड वर्षात एक-एक करुन वेगवेगळ्या कारणांमुळे भाजपचे मित्रपक्ष एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता केवळ एकाच पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत आहेत. परंतु त्याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यंदाच्या नवरात्रीदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी सुरुवातीला चर्चा होती. परंतु आता पीएम मोदी बिहार निवडणुकीदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

कॅबिनेटमध्ये 57 मंत्री होते

पीएम मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात बनवलेल्या मंत्रिमंडळात सुरुवातीला 57 मंत्री होते. त्यावेळी जदयू आणि अपना दल या पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावेळी अशी चर्चा सुरु होती की, मोदी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. त्यामध्ये या दोन पक्षांना स्थान दिले जाईल.

मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. परतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आहे.

आता फक्त आठवलेंवर भिस्त

अकाली दलच्या हरसिमरत कौर यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान लोजपाचे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एक मंत्री गैरभाजप पक्षाचे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रिय मंत्रीमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात मराठीचा आग्रह संविधानविरोधी, आठवलेंना भय्यांचा पुळका

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान : राजकीय हवेचा अंदाज अचूक ओळखणारा नेता

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान यांच्या जाण्याने देशाने द्रष्टा नेता गमावला: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

(After Ram Vilas Paswan demise only one non bjp face in nda cabinet now)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.