राज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे

राज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे

अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.

अहमदनगर मनपाच्या निवडणुकीतील महत्त्वाच्या घडामोडी – 

 1. अहमदनगर मनपाची निवडणूक राज्याचा सत्ताकारणात भूकंप निर्माण करणारी आहे.
 2. अहमदनगरला प्रथमच उघडपणे भाजप आणि राष्ट्रवादीची अभद्र युती, भाजप मंत्री गिरीश महाजन सकाळीच नगरला ठाण मांडून असल्यानं पूर्वनियोजित युती, अहमदनगरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अभद्र युतीला पाठिंबा
 3. भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि व्याही राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप आणि आमदार जावई संग्राम जगताप यांच्या हातात पुन्हा सत्तेच्या चाव्या
 4. अहमदनगर मनपात पुन्हा भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि जावई राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं सोयरेधायरेचं राजकारण, कर्डिलेंच्या दोन्ही मुली शितल जगताप आणि ज्योती गाडे राष्ट्रवादीच्या नगरसेविका
 5. मनपा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यावर केडगावच्या काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, हे सहा उमेदवार भाजप आमदार कर्डिलेंचे व्याही जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या भानुदास कोतकर समर्थक आहेत.
 6. केडगावच्या  दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडाचा आरोप कर्डिले, जगताप आणि कोतकरांवर आहे.  आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली होती. तर एसपी ऑफीस तोडफोड प्रकरणी आमदार कर्डिले अटकेत होते. मात्र ऐन निवडणुकीत एक रात्रीत भाजपचे आमदार कर्डिले यांनी काँग्रेसचे सहा उमेदवार ठरवून भाजपात आणले.
 7. अहमदनगर मनपाच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कोतकर गटाची लगट मतदारांना रुचली नाही. तिथं आठ पैकी चार जागा शिवसेनेनं जिंकल्या. केडगाव हत्याकांडातील सहानुभूती शिवसेनेला मिळाली, मतदारांनी शिवसेनेला जवळ केले.
 8. काँग्रेसनं भाजपला जातीयवादी म्हणत महापौर निवडीवर बहिष्कार टाकला, मात्र बहिष्कार टाकून अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिला.  काँग्रेसची भूमिका ही भाजपला पोषक, काँग्रेसचा भाजपला विरोध नाटकी ठरला.
 9. इथं काँग्रेसची धुरा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे सांभाळत आहेत. सुजय विखे हे नगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढविण्याची मोर्चेबांधणी करत आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याची भूमिका नुकतीच घेतली होती. सुजय विखे हे भाजपकडून खासदारकी लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं विखे परिवारानं महापौर निवडीवर बहिष्कार टाकून भाजपला पाठबळ दिल्याची चर्चा आहे.
 10. केडगाव हत्याकांडात भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार व्याही अरुण जगताप  आणि जावई संग्राम जगताप त्याचबरोबर दुसरे व्याही आणि माजी महापौर संदीप कोतकर आरोप आहेत. तर कोतकर कुटुंबीय एका हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. तर कोतकरांची सून माजी उपमहापौर आणि कर्डिलेंची लेक सुवर्णा कोतकर या सुद्धा हत्याकांडात आरोप  असून फरारी आहेत.
 11. अहमदनगर महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे आमदार व्याही आणि जावाई जगताप पिता पुत्र आणि दुसर  व्याही कोतकर कुटुंबियांचा गळ्याभोवती केडगाव शिवसैनिकांच्या हत्याकांडाचा फास आहे. त्यामुळं हा कारवाईचा फास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सैल करण्याचा प्रयत्न आहे.
 12. अहमदनगरच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपात संघर्ष उफाळणार
 13. भाजप आणि राष्ट्रवादीकडून शिवद्रोही श्रीपाद छिंदमचा स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी वापर करुन हिणपणाचा कळस गाठला
 14. श्रीपाद छिंदम मूळचा भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे व्याही आमदार अरुण जगताप,  दुसरे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या भानुदास कोतकरचा कार्यकर्ता, यांच्या आशिर्वादानं छिंदमनं गुन्हेगारी वाढवून जमिनी बळकावल्याचा आरोप आहे.
 15. स्थानिक राजकारणाचा विचार करुन छिंदम भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या वळचणीला गेला. गांधींनी छिंदमला उपमहापौर केला.  शिवरायाबददल बेताल वक्तव्य केल्यावर त्याला बडतर्फ केले मात्र त्याला गांधी, कर्डिले आणि जगतापांचा छुपा सहकार्य होतंच.
 16. छिंदमनं महापौर निवडीत सेनेला केलेलं मतदान हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे,  सेनेला बदनाम करण्यासाठी भाजप खासदार दिलीप गांधी, भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा कट असल्याचा आरोप होत आहे.
 17. अहमदनगर शहराच्या राजकारणात शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल राठोड हे एकहाती नेतृत्व आहे. तर भाजप खासदार दिलीप गांधींचे त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आणि सून दीप्ती गांधींचा पराभव शिवसेनेने केला. त्यामुळं राठोड आणि खासदार गांधी यांच्यातून विस्तवही जात नाही. तर शिवसैनिकांच्या हत्याकांडावरुन भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि राठोड यांच्यात हाडवैर आहे. त्यामुळं शहराच्या राजकारणात भाजप खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा कॉमन राजकीय शत्री अनिल राठोड असल्यानं सर्वजण पक्षभेद विसरुन एकत्र आले.
 18. राज्याच्या राजकारणात शिवसेनेनं ‘एकला चलो’चा नारा दिला. त्यामुळं युती न झाल्यास भाजपला एक एक आमदार खासदार महत्वाचा आहे. त्यामुळं येत्या काळात जगताप पिता पुत्र आणि कर्डिले कुटुंबीयांवरील कारवाईचा फास सैल झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे नगर शहरात भाजपचे आमदार पदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर   

शिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल   

आम्हाला मतदान का केलंस?, शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोपलं    

पक्षाच्या आदेशाला केराची टोपली, नगरमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची भाजपला मतं 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें